मोफत धान्य वाटपाला होणार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:17 AM2021-05-13T04:17:08+5:302021-05-13T04:17:08+5:30
त्यानुसार मे महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे, अंत्योदय योजनेत प्रत्येक कार्डधारकास २५ किलो भरड धान्य, तांदूळ १० ...
त्यानुसार मे महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाणे, अंत्योदय योजनेत प्रत्येक कार्डधारकास २५ किलो भरड धान्य, तांदूळ १० किलो मोफत दिले जाणार आहेत. तर प्राधान्य कुटुंबयोजनेतील कार्डधारकांना प्रति सदस्य तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिले जाणार आहेत. त्यासोबतच याच महिन्यात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत धान्य प्रति सदस्य पाच किलो दिले जाणार आहे.
जून महिन्यात नियमित दोन रुपये प्रति किलो गहू आणि तीन रुपये प्रति किलो तांदूळ अशा दराने वितरित केले जाणार आहे, तर जून महिन्यात पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत धान्य कुटुंबातील प्रति सदस्य पाच किलो याप्रमाणे दिले जाणार आहे.
या धान्य वाटपासाठी ई पॉस मशीनवर दुकानदारांना स्वत:चे आधार प्रमाणित करण्याची मुभा देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकारचे धान्य गरजूंना मिळण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच त्यांना वेळोवेळी या स्वस्त धान्य दुकानांना भेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.