धार्मिक, सामाजिक व दु:ख कार्यात मोफत शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 03:47 PM2019-01-02T15:47:35+5:302019-01-02T15:48:48+5:30
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे धार्मिक, सामाजिक व दु:खाच्या प्रसंगी मातृभूमी अॅक्वा वॉटरतर्फे पाटील कुटुंबीय मोफत घरपोच पाण्याची सेवा देण्याचे सामाजिक कार्य करीत आहेत.
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे धार्मिक, सामाजिक व दु:खाच्या प्रसंगी मातृभूमी अॅक्वा वॉटरतर्फे पाटील कुटुंबीय मोफत घरपोच पाण्याची सेवा देण्याचे सामाजिक कार्य करीत आहेत.
गावात कोठेही धार्मिक, सामाजिक किंवा दु:ख कार्य असल्यास तेथे शुद्ध पाण्याची विनामूल्य सेवा देण्याचे कार्य जितेंद्र व प्रवीण पाटील करीत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.
सध्या राज्यासह, जिल्ह्यात व तालुक्यात दुष्काळसदृष्य स्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहे. यासाठी साकेगावसह भुसावळ, जोगलखेडा, जळगाव खुर्द, सुनसगाव, वांजोळा, गोंभी या गावाना नाममात्र शुल्कावर एक रुपयाला एक लीटर, दोनला दोन लीटर, पाचला पाच व दहाला २० लीटर याप्रमाणे घरपोच शुद्ध अॅक्वाचे पाणी देण्याची सेवा ही करतात. जारमध्ये पाणी भरत असताना ते वाया जाऊ नये याकरिता विहीर पुनर्भरणचे कार्यही पाटील बंधू करतात. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहेत.