महिलांमध्ये फ्री-स्टाईल

By admin | Published: January 5, 2017 12:47 AM2017-01-05T00:47:52+5:302017-01-05T00:47:52+5:30

रांगेत उभे राहण्यावरून वाद : दाखल्यांसाठी तहसीलमध्ये गर्दी

Free-style women | महिलांमध्ये फ्री-स्टाईल

महिलांमध्ये फ्री-स्टाईल

Next


जळगाव : प्राधान्य कुटुंब योजनेतील समावेशासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्रासाठी सेतु सुविधा केंद्रासमोरील रांगेत उभे राहण्यावरून बुधवारी दुपारी दोन महिलांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाली.
शासनातर्फे प्राधान्य कुटुंब योजनेसाठी जिल्हानिहाय इष्टांक दिला आहे. जळगाव तालुक्यासाठी सुमारे 11 हजार युनिटचा इष्टांक दिला आहे. या योजनेतील लाभासाठी उत्पन्नाचा दाखल्याची अट ठेवण्यात आली आहे. त्यासाठी सेतु सुविधा केंद्रासमोर नागरिकांची गर्दी होत आहे. बुधवारी दुपारी रांगेत उभे राहण्यावरून दोन महिलांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी झाली. दोन्ही महिलांनी एकमेकींना मारहाण करीत केस ओढले. यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली. आजूबाजूच्या काही महिलांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला.

Web Title: Free-style women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.