म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात दोन ठिकाणी मोफत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:15 AM2021-05-23T04:15:50+5:302021-05-23T04:15:50+5:30

जिल्ह्यात शासकीय यंत्रणेत सध्या २२ रुग्णांची नोंद असली तरी खासगी रुग्णालयात मात्र १०० च्या वर रुग्ण याचे उपचार घेत ...

Free treatment of mucomycosis at two locations in the district | म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात दोन ठिकाणी मोफत उपचार

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यात दोन ठिकाणी मोफत उपचार

Next

जिल्ह्यात शासकीय यंत्रणेत सध्या २२ रुग्णांची नोंद असली तरी खासगी रुग्णालयात मात्र १०० च्या वर रुग्ण याचे उपचार घेत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केवळ कोविड पॉझिटिव्ह रुग्णावरच म्युकरमायकोसिसचे उपचार केले जात आहेत. या ठिकाणी सध्या ८ रुग्ण कक्ष ७ मध्ये उपचार घेत आहेत. या ठिकाणी कान, नाक, घसा तज्ज्ञ, दंतरोग, नेत्र रोग तज्ज्ञ या रुग्णांवर लक्ष ठेवून असून, या आजाराचे औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. कोणत्या रुग्णाला शस्त्रक्रियेची गरज असल्यास तीही या रुग्णालयात होईल, असे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले आहे. डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ही शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध आहे.

इंजेक्शनचा तुटवडाच

जिल्ह्यात एमफेटेरिसीन बी या म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचा तुटवडा असून, रुग्णांची यासाठी फिरफिर होत आहे. प्रशासनाने यावर नियंत्रण आणले आहे. दरम्यान, जीएमसीत २५० इंजेक्शन आले होते; मात्र ते आठ रुग्णांना देण्यात आले आहे. त्याचे नियोजन झाले असल्याने अधिक इंजेक्शनची गरज या रुग्णालयात आहे.

Web Title: Free treatment of mucomycosis at two locations in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.