जळगावात हगणदरीमुक्तीसाठी मोफत वायफायचा फंडा

By admin | Published: June 29, 2017 05:04 PM2017-06-29T17:04:56+5:302017-06-29T17:16:01+5:30

मराठी प्रतिष्ठान व नागरिकांचा पुढाकार: रोज सायंकाळी दोन तास मिळणार सुविधा

Free Vaiphana Fund for Handicrafts Declaration in Jalgaon | जळगावात हगणदरीमुक्तीसाठी मोफत वायफायचा फंडा

जळगावात हगणदरीमुक्तीसाठी मोफत वायफायचा फंडा

Next
सुशील देवकर/ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.29- शिरसोली नाक्यावर गणपतीनगरमधून तांबापुराकडे जाणा:या रस्त्यावर असलेली हगणदरी बंद करण्यासाठी तेथील रहिवाशांनी तसेच मराठी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. या रस्त्यावर दुतर्फा गुरूवारी  वृक्षारोपण करण्यात आले. 25 कडुनिंबाच्या रोपांची लागवड करण्यात आली. तसेच या ठिकाणी बाक टाकून युवकांना  रोज सायंकाळी दोन तास मोफत वायफाय देण्याचा फंडा राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक रहिवाशाने मोफत वाय-फाय उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
राष्ट्रपतींर्पयत केला होता पत्रव्यवहार
शिरसोली नाक्यावरील गणपती नगरकडे जाणा:या रस्त्यावरील हगणदरी बंद करण्यासाठी याच भागातील रहिवासी राम आहुजा यांनी थेट राष्ट्रपती व पंतप्रधानांर्पयत पत्रव्यवहार केला होता. मात्र तरीही ही हगणदरी बंद करणे मनपाला शक्य झाले नव्हते.  अखेर स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत मनपाच्या मोहीमेला हातभार लावला आहे.
वाय-फाय झोन व रस्ता सुशोभिकरणाचा संकल्प
मराठी प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी सिमेंटचे बाक बसविण्यात येणार असून रस्ता सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी वाय-फाय झोन करण्यात येणार आहे. त्यासाठी रोज सायंकाळी दोन तास मोफत वाय-फाय देण्याची तयारी रहिवासी सुरेश मंडोरा यांनी दर्शविली आहे. 
महापालिकेने केला होता रस्ता बंद
हगणदरी मुक्त शहर योजनेंतर्गत मनपाने शहरातील 58 ठिकाणी असलेली हगणदरी बंद करण्यासाठी कसोशीने प्रय} केले. मात्र शिरसोली रस्त्यावरील आदर्शनगरच्या वळणावरील ही हगणदरी बंद होत नसल्याने आदर्शनगरकडे जाणारा रस्ता तयार सिमेंटचे ब्लॉक टाकून बंद केला. मात्र त्यातील काही ब्लॉक काढून नागरिकांनी रस्ता करून घेतला आहे. 
महापौरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण
रस्ता बंद केलेल्या कोप:यापासून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. गुरूवारी महापौर नितीन लढ्ढा, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे, आयुक्त जीवन सोनवणे, नगरसेविका ज्योती चव्हाण, पृथ्वीराज सोनवणे, रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सी.पी. रोहम, आरोग्याधिकारी डॉ.विकास पाटील तसेच मराठी प्रतिष्ठानचे जमील देशपांडे, प्रमोद ब:हाटे, विजय वाणी, अनिश शहा, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, तसेच सुरेश मंडोरा, राम आहुजा आदी तसेच गणपतीनगर, आदर्शनगरातील नागरिक उपस्थित होते.

 

 

Web Title: Free Vaiphana Fund for Handicrafts Declaration in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.