पिंपळकोठे गावाला मोफत पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 03:17 PM2019-05-26T15:17:14+5:302019-05-26T15:17:18+5:30
रिंगणगावकरांचे औदार्य : टंचाईवर मात
एरंडोल : आजच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व जण पाणी मागत असताना रिंगणगाव, ता.एरंडोल ग्रामपंचायतीने मात्र आपल्या गावाचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवून आपल्या शेजारचे गाव पिंपळकोठे प्रा. चा. येथे भीषण पाणीटंचाई असल्याने त्या गावास मानवता व शेजारधर्म या नात्याने गेले दीड महिना झाले विनामूल्य पाणीपुरवठा करत आहे.
या चांगल्या कामास सर्व रिंगणगाव ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच ग्रामसेवक, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. वॉटर मॅन राजू डोखे यांच्या अथक मेहनतीने हा पाणीपुरवठा आजपर्यंत सुरू आहे.
पिंपळकोठे गावाला जोपर्यंत पाणीटंचाई आहे तोपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचा मानस रिंगणगावच्या सरपंच मृदुला कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. या कामासाठी पिंपळकोठे गावाच्या सरपंच गीताबाई गुजर, ग्रा.पं. सदस्य व ग्रमस्थांनी आनंद व समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान, रिंगणगाव ग्रामपंचायत आणि ग्रागस्थांचे या औदार्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. शेजारधर्म पाळून या गावाने मानवतेच्या दृष्टिकोनातून मोठे काम केले आहे.
जो पर्यंत पिंपळकोठे गावाला पाणी टंचाई आहे, तो पर्यंत पाणीपुरवठ केला जाईल.
-मृदुला कुलकर्णी, सरपंच, रिंगणगाव, ता.एरंडोल.