11 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2017 05:10 PM2017-07-11T17:10:40+5:302017-07-11T17:11:17+5:30

भुसावळ रेल्वे स्थानकावर उपकरणांची उभारणी सुरू : नाशिक रेल्वे स्थानकापासून कामाला सुरूवात

Free WiFi service on 11 railway stations | 11 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा

11 रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा

googlenewsNext

पंढरीनाथ गवळी/ऑनलाईन लोकमत

भुसावळ, दि.11 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ डिजिटल इंडिया’ ला अनुसरुन भुसावळ रेल्वे विभाग हायटेक झाला आहे. प्रवाशांना मोबाईल अॅपवरुन तिकिट उपलब्ध करुन देण्यासोबतच आता या विभागाने प्रवाशांसाठी अत्याधुनिक अशी ‘वायफाय’ प्रणाली रेल्वेत आणली आहे. 
साधारण दोन महिन्यात या विभागातील 11 रेल्वे स्थानकावर ही सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा यांनी ‘लोकमत’ला दिली.
नाशिक येथे आधी उभारणी
मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे विभागातील नाशिक रेल्वे स्थानक एकमेव ए-वन श्रेणीतील रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावर प्रवाशांसाठी मोफत ‘वायफाय’ सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. साधारण सप्टेंबरमध्ये वायफाय सेवा नाशिक स्थानकावर सुरू केली जाणार आहे. 
फलाट क्रमांक 7-8 वर उभारणी
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या नवीन पादचारी पुलाच्या पाय:या जवळ (मुंबई एण्डला) फलाट क्रमांक सात आणि आठच्या मध्ये जिन्या जवळ वायफाय सुविधेसाठी उपकरण बसविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी ुदिली. भुसावळ रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक एक आणि तीन व अन्य फलाटावही वायफाय सेवेसाठी आवश्यक प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी  दिली आहे.
11 रेल्वे स्थानकांची निवड
भुसावळ रेल्वे विभागातील अकोला, बडनेरा, जळगाव, भुसावळ, ब:हाणपूर, खंडवा, शेगाव,नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव या 11 रेल्वे स्थानकांची प्रवाशांना मोफत वायफाय सुविधेचा लाभ मिळणार आहे.
सात रेल्वे स्थानकांचे सव्रेक्षण
भुसावळ रेल्वे विभागातील-नाशिक रोड, जळगाव, ब:हाणपूर, खंडवा, शेगाव, चाळीसगाव, अमरावती या सात रेल्वे स्थानकांचे  ‘वायफाय’ सेवेसाठी याआधीच सव्रेक्षण झाल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे. आधी चार रेल्वे स्थानके आणि नंतर टप्प्या टप्प्याने अन्य स्थानकावर ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.
45 दिवसानंतर मिळणार ‘वायफाय’ ची सेवा 
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात साधारण 45 दिवसानंतर प्रवाशांना मोफत ‘वायफाय’ सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी येथील रेल्वेचे स्थानिक प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. यासाठी एस अॅण्ड टी विभागाच्या समन्वयातून प्रवाशांसाठी वायफाय सेवा पुरविणार असल्याची माहिती  रेल्वेच्या सूत्रांनी दिली. भुसावळ रेल्वे विभागात सुमारे  125 रेल्वे स्थानके आहेत.
देशभरातील 115 स्थानकांत वायफाय सुविधा
भारतीय रेल्वेत 16 झोन आहेत. यासर्व झोनमधील दिल्ली,  चर्चगेटसह तब्बल 115 अत्यंत महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी मोफत ‘वायफाय’ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भारतीय रेल्वेतील सिग्नल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन या विभागाच्या माध्यमातून वायफाय सेवा देईल.

Web Title: Free WiFi service on 11 railway stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.