पांढऱ्या बुरशीपासून महिलेची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:59+5:302021-06-11T04:11:59+5:30

जळगाव : काळ्या बुरशीबरोबरच आता पांढऱ्या बुरशीचेही रुग्ण समोर येत असून, याची लागण झालेल्या एका ३० वर्षीय महिलेवर शासकीय ...

Freedom of woman from white fungus | पांढऱ्या बुरशीपासून महिलेची सुटका

पांढऱ्या बुरशीपासून महिलेची सुटका

Next

जळगाव : काळ्या बुरशीबरोबरच आता पांढऱ्या बुरशीचेही रुग्ण समोर येत असून, याची लागण झालेल्या एका ३० वर्षीय महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, अशा बुरशीची लागण असलेल्या अन्य दोन रुग्णांवर या ठिकाणी उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जळगाव तालुक्यातील भोकर येथील ३० वर्षीय महिलेला अस्परजिलस आजारामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २६ मे रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेला ७ वर्षांपासूनच क्षयरोग व फुप्फुस काम करीत नसल्याचे वैद्यकीय पथकाला दिसून आले. महिलेच्या आजाराचे निदान केल्यावर तिला पांढऱ्या बुरशीचा आजार अर्थात अस्परजिलस असल्याचे समजले. सोबत श्वास घेण्यासही त्रास होता. त्यामुळे जीएमसीच्या वैद्यकीय पथकाने तातडीने औषधोपचार केल्याने १५ दिवसांत महिलेला आराम मिळाला.

औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ. आस्था गनेरीवाल, डॉ. नेहा चौधरी, डॉ. स्वप्निल चौधरी, डॉ. अमित भंगाळे, डॉ. रोहन केळकर, डॉ. शाल्मी खानापूरकर, कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राऊत यांच्यासह सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, डॉ. किरण अहिरे, नेत्र शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. अंजली सिंग, दंत शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाल आदींसह वाॅर्ड इन्चार्ज परिचारिका रोजमेरी वळवी, शामल चौधरी, आकाश गायकवाड, तेजस नेमाडे, कक्षसेवक नितीन जगताप, राजेंद्र सूर्यवंशी, चेतन सरोदे, पूजा बऱ्हाटे, प्रतीक्षा साबळे, अश्विनी सैंदाणे आदींनी उपचार करण्याकामी परिश्रम घेतले. महिलेला बुधवारी ९ जून रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.

कोट

हे बुरशीजन्य आजार पूर्वीपासूनचे आहेत. मात्र, त्याचे अधिक रुग्ण सापडत नव्हते, आता ते रुग्ण अधिक आढळून येत असून, विविध प्रकारच्या बुरशींची लागण यात होऊ शकते, यात पांढरी बुरशी ही त्यामानाने कमी घातक असते, याला अस्परजिलस संबोधतात. या महिलेला शस्त्रक्रियेची गरज पडली नाही, इंजेक्शन आणि औषधोपचारानेच त्या बऱ्या झाल्या.

- डॉ. विजय गायकवाड, सहयोगी प्राध्यापक औषध वैद्यकीय शास्त्र विभाग

Web Title: Freedom of woman from white fungus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.