आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधींवर शुक्रवारी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:22+5:302021-07-29T04:17:22+5:30

जळगाव : राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत शुक्रवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत ...

Friday guidance on employment opportunities in the health sector | आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधींवर शुक्रवारी मार्गदर्शन

आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधींवर शुक्रवारी मार्गदर्शन

Next

जळगाव : राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत शुक्रवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘कौशल्यातून रोजगाराकडे आरोग्य’ व ‘आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी’ या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कौशल्य अभियान अधिकारी नितीन जाधव, श्रीपाद आमले, अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. विठ्ठल लहाने मार्गदर्शन करणार आहेत.

---------------

‘स्टॅण्ड अप इंडिया’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव : धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांसाठी ‘स्टॅण्ड अप इंडिया’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ धनगर समाजातील पात्र महिला उद्योजकांना देण्यात येणार आहे. पूर्तता करीत असलेल्या महिला उद्योजकांनी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

-------------

चौकीदार पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव : सैनिक मुलींचे वसतीगृहात चौकीदार पद कंत्राटी पद्धतीने नेमणुक करण्यासाठी ५० पेक्षा जास्त वय असलेल्या माजी सैनिक तसेच इतर नागरिकांनी ५ ऑगस्टपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे.

Web Title: Friday guidance on employment opportunities in the health sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.