तळेले कॉलनी कोरोना हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:41 AM2021-01-13T04:41:07+5:302021-01-13T04:41:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक भागात केवळ एक-एक, दोन-दोन कोरोनाचे रुग्ण समोर येत असल्याने दिलासा ...

Fried Colony Corona Hotspot | तळेले कॉलनी कोरोना हॉटस्पॉट

तळेले कॉलनी कोरोना हॉटस्पॉट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक भागात केवळ एक-एक, दोन-दोन कोरोनाचे रुग्ण समोर येत असल्याने दिलासा होता. मात्र, अचानक शहरातील काही भागांमध्ये रुग्णवाढ समोर येत असून यात तळेले कॉलनीत एकाच कुटुंबातील तीन आणि अन्य तीन असे सहाजण बाधित आढळून आले आहेत. यासह अनेक भागात तीन-तीन रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात मंगळवारी ६३९ अहवाल प्राप्त झाले. त्यात ५६ बाधित रुग्ण आढळून आले असून हे प्रमाण वाढून आता ८.७ टक्क्यांवर पोहोचले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हे प्रमाण वाढले आहे. गंभीर बाब म्हणजे जिल्ह्याच्या एकत्रित रुग्णांमध्ये जळगाव शहरातील ७१ टक्के रुग्णांचा समावेश आहे. ५४ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. एकही मृत्यू नसल्याने दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बाहेरील जिल्ह्यातील एक रुग्ण ॲन्टिजेन चाचणीत समोर आला असून त्यांना दाखल करून घेण्यात आले आहेत. आठ तालुक्यांमध्ये एकही रुग्ण नसतानाही रुग्णसंख्या ५६ नोंदविली गेली आहे.

शहरातील या भागात रुग्ण

तळेले कॉलनी ६, महाबळ, एमआयडीसी, समर्थ कॉलनी येथे प्रत्येकी ३, मेहरूण २, श्रद्धा कॉलनी, पिंप्राळा, गणपतीनगर, विवेक कॉलनी, जीवननगर, श्रीरामनगर, दादावाडी या भागांत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

Web Title: Fried Colony Corona Hotspot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.