प्रधानमंत्री आवासपासून वंचित लाभार्र्थींचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 05:47 PM2019-06-05T17:47:10+5:302019-06-05T17:49:36+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या शासकीय अतिक्रमित लाभार्र्थींना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करून भारिप बहुजन महासंघातर्फे मंगळवारी फैजपूर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत असलेल्या शासकीय अतिक्रमित लाभार्र्थींना या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करून भारिप बहुजन महासंघातर्फे मंगळवारी फैजपूर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व भारिप बहुजन महासंघ यावल तालुकाध्यक्ष तथा माजी नगरसेवक मनोज कापडे यांनी केले. यावेळी त्यांनी फैजपूर पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चौव्हाण यांच्याशी चर्चा केली. या वेळी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घटक क्र. १ (शासकीय अतिक्रमित ) असलेल्या गोरगरीब वर्गाला शासनाचा आदेश असतानासुद्धा त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवले जात आहे. गोरगरीब लोकांच्या न्याय हक्कासाठी ७ मार्च रोजी निवेदन सादर केले. संबंधित विषयाची दखल न घेतल्यामुळे लोकशाही मार्गाने ४ जून रोजी मोर्चा काढून भावना व्यक्त केल्याचे नमूद करून पालिका प्रशासनाने आमची दखल नाही घेतल्यास येत्या १ जुलैला पालिकेसमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या मोर्चाला फैजपूर दिव्यांग सेनेतर्फे पाठिंबा देऊन दिव्यांग सेनेचे यावल तालुकाध्यक्ष नाना मोची, दिव्यांग सेनेचे शहराध्यक्ष नितीन महाजन, सचिव मुन्ना चौधरी, गणेश भारंब,े संजय वानखेडे, ललित वाघुळदे यांच्यासह दिव्यांग बांधव व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अशोक भालेराव, वंचित बहुजन आघाडी सचिव दीपक मेघे, युवा तालुकाध्यक्ष सचिन बाºहे, माधव नरसो मोरे, कल्पना सावकारे, वच्छला श्रावण आढायगे, पिंटू चावदस वाघूळदे , पवन चुडामम भिल, मांगो बाबूराव भिल्ल, आकाश पोपट भिल्ल यांच्यासह अण्णाभाऊ साठे नगर व एकलव्य नगरमधील महिला व युवा वर्ग तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले.