पहूरकरांसमोर भीषण ‘जलसंकट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:50 AM2018-10-28T00:50:15+5:302018-10-28T00:53:12+5:30

पहूर ता. जामनेर : पहूर पेठ, कसबे येथे पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण होऊ घातली असून यावर उपाययोजना करण्यासाठी सरपंचांनी तहसीलदारांना निवेदन दिली आहेत. तथापि तालुका प्रशासन निद्रीस्त अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 In front of the grave, the grueling "water conservation" | पहूरकरांसमोर भीषण ‘जलसंकट’

पहूरकरांसमोर भीषण ‘जलसंकट’

Next
ठळक मुद्देगोगडी धरणात अत्यल्प साठा शिल्लककमी पावसामुळे यंदा आॅक्टोबरपासूनच संकट

पहूर ता. जामनेर : पावसाळ्यात दमदार पाऊस झाला नाही. व परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने परिसरातील धरणे भरली नाहीत. काही धरणांमध्ये अल्प पाणीसाठे शिल्लक आहेत. पण या पाण्याचा उपसा होत असल्याने काही दिवसातच पहूरकरांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची स्थिती येऊन ठेपणार आहे. आरक्षित ठेवलेल्या पाण्यासाठी पेठ व कसबे ग्रामपंचायतीने तातडीने कठोर भूमिका घेऊन कृषीपंप उचलण्यासाठी तहसीलदारांसह सहाय्यक पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
मोतीआई धरणातून पेठ गावाला पाणी पुरवठा ग्रामपंचायत पेठच्या माध्यमातून केला जातो. यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही.
तुरळक झालेल्या पावसाने वाघूर नदीला आलेल्या पाण्यामुळे मोतीआई धरणात अल्पसा पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा गावाच्या पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आला आहे. तर गोगडी धरणातून कसबे गावाला पाणी पुरवठा केला जातो. या धरणातील पाणी साठा संपुष्टात आला असून मृत साठ्यातून पाणी पुरवठा करतांना कसबे ग्रामपंचायतची दमछाक होत आहे. आरक्षित केलेल्या पाणी साठ्यातून कृषीपंपाव्दारे उपसा केला जात असल्याने येत्या काही दिवसातच पहूरकरांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार असल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही गावांची लोकसंख्या जवळपास पंचवीस ते तीस हजार असून दोन्ही ग्रामपंचायतीसमोर पाण्याचा भीषण प्रश्न उभा ठाकला आहे. हा प्रश्न दरवर्षी मार्च, एप्रिल नंतर निर्माण होत असे यंदा मात्र आॅक्टोबर महिन्यापासूनच ही पाणी टंचाईची परिस्थिती पहावयास मिळत आहे.
पहूर परिसरात दुष्काळसदृष्य स्थिती
पुरेसा पाऊस न झाल्यामूळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. बरड जमीनीवरील कपाशी, मका, ज्वारी पिके करपून गेली आहेत. परीसरात उपलब्ध असलेले पाणी देऊन शेतकरी आहे ते कपाशी पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत आहे. हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी महत्वाचा बनला आहे. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेले कृषी उत्पन्न मातीमोल झाल्याने दुष्काळाच्या झळा अधिकच जाणवू लागल्या आहेत.

मोतीआई धरणात आरक्षित ठेवण्यात आलेल्या पाणी साठ्यातून गावाच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन केले आहे. या पाण्याचा उपसा करणाºया कृषीपंपाना उचलण्यासाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कृषीपंप उचलण्याची गावात दवंडी फिरविण्यात आली असून नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.
- नीता रामेश्वर पाटील, सरपंच, पहूर पेठ

गोगडी धरणात मृत साठ्यापेक्षाही कमी पाणीसाठा असून कृषीपंप उचलण्यासाठी एक महिन्यात दोन वेळा तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले आहे. प्रशासन उडवाउडवीचे उत्तरे देत असून कारवाई करण्यासाठी पाऊले उचलत नाही. काही दिवसातच पाणी समस्या गंभीर होणार आहे.
-ज्योती शंकर घोंगडे, सरंपच कसबे

 

Web Title:  In front of the grave, the grueling "water conservation"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी