नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ जामनेर, भुसावळ व सावदा येथे मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:53 AM2019-12-25T01:53:44+5:302019-12-25T01:55:06+5:30

नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ मंगळवारी भुसावळ, सावदा व जामनेर येथे राष्टÑीय सुरक्षा मंचतर्फे मोर्चे काढण्यात आले.

 Front in Jamnar, Bhusawal and Sawada in support of the Citizenship Research Bill | नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ जामनेर, भुसावळ व सावदा येथे मोर्चे

नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ जामनेर, भुसावळ व सावदा येथे मोर्चे

Next
ठळक मुद्देमोर्चात व्यापारी, विद्यार्थी संघटना, विविध संघटना पाचोरा येथे विरोधात मोर्चा

भुसावळ/सावदा/जामनेर/पाचोरा : नागरिकत्व संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ मंगळवारी भुसावळ, सावदा व जामनेर येथे राष्टÑीय सुरक्षा मंचतर्फे मोर्चे काढण्यात आले, तर पाचोरा येथे मुस्लीम समाजातर्फे विधेयकाच्या विरोधात मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
भुसावळ येथील मोर्चास सकाळी अष्टभूजा मंदिरापासून सुरुवात झाली. प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकला. मोर्चात व्यापारी, विद्यार्थी संघटना, विविध संघटना, पक्षांचे पदाधिकारी, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे सहभागी झाले. मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. प्रवीण नायसे, योगेश बाविस्कर, शहर संघचालक डॉ.वीरेंद्र झांबरे, डॉ.संजय गादिया, दिेनेश दोधानी, भारती वैष्णव, सिध्देश्वर लटपटे, निर्मल मथरु सरदार, रितेश जैन उपस्थित होते.
सावदा येथे दुर्गामाता चौकातून मोर्चा पोलीस स्टेशनवर आला. कालिदास ठाकूर, चंद्रशेखर पाटील, डॉ.वारके, डॉ.कोळंबे, डॉ.तुषार पाटील, डॉ.स्वप्नील पाटील, स्वप्नील भंगाळे, नगराध्यक्ष अनिता येवले, माजी आमदार हरिभाऊ जावळे, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, कृउबा सभापती श्रीकांत महाजन, अजय भारंबे, जगदीश बढे, सागर चौधरी, सागर पाटील, विनोद नेमाडे, अक्षय सरोदे, राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
जामनेर येथे अभाविप व राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. राहुल चव्हाण, सुदर्शन वराडे, नाना सातवे, मनोज जंजाळ, अक्षय जाधव, आकाश नेमाडे, जि.प.चे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, शिवाजी सोनार, किशोर झांबरे, जगदीश बैरागी, आशुतोष पाटील, शुभम मोरे, राष्ट्रीय सुरक्षा मंचचे अध्यक्ष डॉ. मनोज विसपुते, नगरसेवक डॉ.प्रशांत भोंडे, आतीश झाल्टे, जितेंद्र पाटील, सुहास पाटील, श्रीराम महाजन, बाबूराव हिवराळे, प्रा.शरद पाटील, चंद्रकांत बाविस्कर, नवल पाटील, शंकर मराठे, महेंद्र बाविस्कर, दीपक तायडे, दिलीप खोडपे, राजधर पांढरे आदी हजर होते.
पाचोरा येथे विरोधात मोर्चा
पाचोरा : येथे नागरिकत्व विधेयकाविरुद्ध मुस्लीम समाजातर्फे तहसीलवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नेतृत्व खलील देशमुख, अझर खान यांनी केले. रउफ बागवान, एजाज बागवान, आयुब बागवान, शाकिर बागवान, राष्ट्रवादीचे संजय वाघ, काँग्रेसचे साहेबराव पाटील, सचिन सोमवंशी, प्रतिभा शिंदे, मुकुल सपकाळे, रहेमान खान, नासिर बागवान, रसूल शेख, नितीन तावडे , सुनील शिंदे, शेख इस्माईल शेख फकिरा, किशोर डोंगरे, सतार पिंजारी यांच्यासह मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Web Title:  Front in Jamnar, Bhusawal and Sawada in support of the Citizenship Research Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.