रावेर तहसील कार्यालयासमोर ‘जनसंग्राम’ चे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:35 AM2018-08-08T00:35:33+5:302018-08-08T00:40:37+5:30
सरकारकडून आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाºया या सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. रावेर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी जनसंग्राम संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.
रावेर, जि. जळगाव : कर्जमाफीची घोषणा करूनही ती मिळाली नाही, अब्जावधी रूपयांची केळी जमीनदोस्त होवून अजूनही दमडी शेतकºयांच्या पदरात पडली नाही, कापसावर नवीन बोंडअळी पडली तरी गतवर्षाचे बोंडअळीच्या नुकसानीचे अर्थसाहाय्य अजून पदरात पडले नाही. हंगामावर हंगाम तोट्यात जात असतांना सरकारकडून आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसणाºया या सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. रावेर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी जनसंग्राम संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.
जनसंग्राम बहुजन लोकमंचचे अध्यक्ष विवेक ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज रावेर तहसील कार्यालयासमोर दुपारी १२ वाजेच्या सुमारास एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आली.
दरम्यान, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हितासंबंधी नाकर्तेपणावर खरपूस टिका केली. जनसंग्रामचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी शेतकºयांच्या नुकसानासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याची टीका करत गत चार वर्षांपासून होत नसलेली आमसभा घेण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, युवक रा. काँ तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, रावेर तालुका अॅग्रो डिलर्सचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, जिजाबराव पाटील, महेश लोखंडे, राजेंद्र चौधरी, विलास ताठे, शालीग्राम पाटील, प्रमोद कोंडे, हृदयेश पाटील, शेख महेमुद शेख हसन, शिवाजी पाटील, भागवत महाजन, विजय पुराणे, किरण चौधरी, इसाक पटेल, धिरज चौधरी, मुज्जफर पटेल, शेख मंजूर शेख कादर, मधुकर पाटील, सुरेश शिंदे, अरविंद गांधी, लक्ष्मण मोपारी, काशीनाथ रायमळे, युसूफ खान इब्राहिम खान, शेख गयास, शेख कालू, डी.डी.वाणी, अशोक गढे, पुंडलिक पाटील, भागवत चौधरी, यशवंत महाजन, शिवाजी पाटील आदी यावेळी सहभागी झाले होते. दरम्यान, तहसीलदार विजयकुमार ढगे यांनी धरणे आंदोलनस्थळी भेट दिली असता आंदोलनकर्त्यांनी निवेदन सादर केले.