पाण्यासाठी यावल नगराध्यक्षांच्या निवासस्थानावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 06:56 PM2019-04-07T18:56:07+5:302019-04-07T18:57:08+5:30

यावल शहरातील देशमुखवाडा, माळीवाडा, बसमळा परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी परिसरातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने परिसरातील स्त्री-पुरुषांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास थेट नगराध्यक्षा सुरेखा कोळी व नगरसेविका पौर्णिमा फालक यांच्या घरावर मोर्चा काढून संतप्त भावना व्यक्त केल्या.

Front at the residence of Jawahar Nagar president | पाण्यासाठी यावल नगराध्यक्षांच्या निवासस्थानावर मोर्चा

पाण्यासाठी यावल नगराध्यक्षांच्या निवासस्थानावर मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देपुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याची व्थानगराध्यक्षांनी केला मोर्चाचा इन्कार

यावल, जि.जळगाव : शहरातील देशमुखवाडा, माळीवाडा, बसमळा परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी परिसरातील नागरिकांना पाणी न मिळाल्याने परिसरातील स्त्री-पुरुषांनी सकाळी सहा वाजेच्या सुमारास थेट नगराध्यक्षा सुरेखा कोळी व नगरसेविका पौर्णिमा फालक यांच्या घरावर मोर्चा काढून संतप्त भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, नगराध्यक्षांनी मोर्चा आल्याचा इन्कार केला आहे. या परिसरात गेल्या एक वर्षभरापासून पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याच्या नागरिकांच्या लेखी तक्रारी पालीकेत दिलेल्या आहेत.
पाणीपुरवठा विभागप्रमुख देवरे यांच्यासह प्रभागातील संबंधित नगरसेवक जाणून-बुजून आणि वैयक्तिक द्वेषभावनेतून या भागाकडे दुर्लक्ष करीत असल्याचाही आरोप नागरीकांनी केला आहे.
शहरात अन्य भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होऊन पाणी गटारीत व रस्त्यावर फेकून पाण्याचा सर्रास गैरवापर होत आहे. पाणीपुरवठा विभागातील कारभाराची चौकशी झाल्यास पाणीपुरवठा विभागातील मोठा गैरप्रकार उघडकीस येईल, असेही नागरिकांनी सांगितले. नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांनी तातडीने लक्ष केंद्रीत सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.

Web Title: Front at the residence of Jawahar Nagar president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.