कु-हाड ग्रामपंचायतीवर महिलांचा पाण्यासाठी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 07:15 PM2018-04-13T19:15:00+5:302018-04-13T19:15:00+5:30

सोमवारी विशेष ग्रामसभा : टंचाई निवारण न झाल्यास पुन्हा मोर्चाचा इशारा

Front row for women's water on Kuhad Gram Panchayat | कु-हाड ग्रामपंचायतीवर महिलांचा पाण्यासाठी मोर्चा

कु-हाड ग्रामपंचायतीवर महिलांचा पाण्यासाठी मोर्चा

Next
ठळक मुद्देसोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजनटँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणीग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
कु-हाड ता.पाचोरा : दहा हजार लोकसंख्या असलेल्या कु-हाड खुर्द गावात सध्या पंधरा ते वीस दिवसाआड फक्त पंधरा मिनीटे पाणीपुरवठा होत आहेत. यामुळे त्रस्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला.
संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये येत ग्रामसेवकास पाणी टंचाईबाबत माहिती दिली. तसेच टंचाई निवारणासाठी काय उपाययोजना केली याबाबत जाब विचारला. दोन आठवडे पाणी साठवून ठेवल्यानंतर त्यात जंत निर्माण होत असल्याचे महिलांनी सांगितले. १५ दिवस पाणी साठविल्यानंतर ते पिण्यायोग्य राहत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी टंचाईच्या निवारणासाठी तत्काळ उपाययोजना न केल्यास पुन्हा आठवडाभरानंतर ग्रामपंचायतीवर महिलांकडून घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त
ग्रामपंचायतीवर जुलै २०१७ पासून प्रशासक नियुक्त आहे. विस्तार अधिकारी आर.एस.धस हे प्रशासक आहेत. गावातील अंतर्गत कलहामुळे नागरिकांच्या मुलभुत समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे नाल्यांना देखील पाणी नाही. त्यामुळे परिसरातील मोठे जलाशये कोरडेठाक आहेत.यामुळे या परिसरात पाण्याचे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना दुरवरुन उन्हातानात डोक्यावर, बैलगाडी, सायकलीवरुन पाणी आणावे लागत आहेत. काही ठिकाणी गावात खाजगी टँकरने पन्नास रुपये प्रती टाकी विक्री करण्यात येत आहे.

टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी
कुºहाड गावातील पाण्याची भीषण परिस्थिती पाहता ग्रामस्थांना प्रशासनाने दररोज टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी होत आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठवून त्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.

सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन
मागील वर्षी करण्यात आलेली बहुळा धरणाची तात्पुरती पाणी पुरवठा योजना सध्या धरणक्षेत्रातील विहीरीच्या अपुर्ण कामामुळे रखडली आहे. या विहीरीचे खोलीकरण व आडवे बोअरिंग केल्यास गावाला तीन चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल. यासाठी पाण्यासंदर्भात येत्या सोमवारला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याचे ग्रामसेवक पी.ए.चव्हाण यांनी सांगीतले.

Web Title: Front row for women's water on Kuhad Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.