शिरसोलीकरांचा ‘महावितरण’ कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 08:06 PM2018-08-27T20:06:27+5:302018-08-27T20:10:44+5:30
रोहित्रातील बिघाडामुळे तीन दिवसांपासून अंधारात आहोत, दम्याचा आजार असलेल्या वृध्द महिलेचा वीज नसल्यामुळे मृत्यू झाला़ वारंवार तक्रार करून सुध्दा संबंधित अधिकारी तुम्ही सुध्दा आकोडे टाका असे म्हणतात साहेब़ आता किती जीव घेणार? असा सवाल शिरसोली प्ऱऩ मधील संतप्त इंदिरानगरवासीयांनी दीक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयात येऊन अधिकाºयांना केला़
जळगाव- रोहित्रातील बिघाडामुळे तीन दिवसांपासून अंधारात आहोत, दम्याचा आजार असलेल्या वृध्द महिलेचा वीज नसल्यामुळे मृत्यू झाला़ वारंवार तक्रार करून सुध्दा संबंधित अधिकारी तुम्ही सुध्दा आकोडे टाका असे म्हणतात साहेब़ आता किती जीव घेणार? असा सवाल शिरसोली प्ऱऩ मधील संतप्त इंदिरानगरवासीयांनी दीक्षितवाडीतील महावितरणच्या कार्यालयात येऊन अधिकाºयांना केला़
गेल्या वर्षभरपासून सकाळी किंवा सायंकाळी या वेळात इंदिरानगरातील वीज पुरवठा खंडित व्हायची़ याबाबत परिसरातील रहिवासी संजय पाटील यांनी महावितरणकडे अर्ज करून ही समस्या सोडवावी याबाबत अर्ज केला होता़ दरम्यान, आॅगस्ट महिन्यात अनेकवेळा दिवसभर वीज गुल होण्याचा प्रकारही सुरू झाला़ अन् गेल्या तीन दिवसांपासून रोहित्र दोन वेळेस आणि केबल देखील दोन वेळा जळाली़ त्यामुळे इंदिरानगरवासी हे तीन दिवसांपासून अंधारात आहेत़ अखेर सोमवारी संतप्त रहिवाश्यांनी आक्रमक भूमिका घेत सकाळी ११़३० वाजता महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला़ तब्बल दोन तास रहिवाश्यांनी ठिय्या मांडत मुख्य कार्यकारी अभियंता संजय तडवी यांना घेराव घालत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले़ तडवी यांनी रहिवाश्यांचे ऐकून घेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला़ मात्र, रहिवाश्यांनी महावितरणाच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली़