लग्नापूर्वीच वेरूळचे प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात

By admin | Published: January 14, 2017 12:38 AM2017-01-14T00:38:12+5:302017-01-14T00:38:12+5:30

जळगाव : एकाच गावात़़़एकाच गल्लीत लहानाचे मोठे झाल़े आठवीपासून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल़े.

In front of Verulayagul police of Verul before marriage | लग्नापूर्वीच वेरूळचे प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात

लग्नापूर्वीच वेरूळचे प्रेमीयुगुल पोलिसांच्या ताब्यात

Next


जळगाव : एकाच गावात़़़एकाच गल्लीत लहानाचे मोठे झाल़े आठवीपासून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल़े.  दोघांनी पदवीर्पयत शिक्षण घेतल़े लग्नासाठी मात्र घरच्यांचा नकार, यामुळे वेगळे होण्याच्या भितीने दोघांनी घरून पळून लग्न करण्याचे ठरविल़े मात्र लग्नापूर्वीच वेरूळ ता. खुलताबाद येथील प्रेमीयुगुलाला    पोलिसांनी जळगावातील पिंप्राळा हुडकोतून  ताब्यात घेतले आह़े 
वेरूळ हेच या दोघांचे गाव़ गावातील एका शाळेत दोघे शिकत असताना आठवीत दोघांचे एकमेकांवर प्रेम जडल़े दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेत पदवीर्पयत सोबत शिक्षण पूर्ण केल़े दोघांच्या लग्नात जातीचा मोठा अडसर होता़
यामुळेच त्यांच्या  कुटुंबियांचा लग्नाला नकार होता़ एकमेकांसोबत जगण्याची अन् मरणाची शपथ घेत एकमेकांनी वेगळे होण्याच्या भितीने पाच दिवसांपूर्वी गावातून पलायन केले होत़े
बसने गाठले जळगाव
घरून तर निघाले मात्र पळून जाणार कुठे? असा प्रश्न दोघांसमोर होता़ मात्र यातील प्रियकर याचा जळगावात मित्र होता़ त्याच्याकडे काही दिवस राहू व यानंतर लग्न करू असे दोघांनी ठरविल़े त्यानुसार दोघे 11 जानेवारी रोजी बसने जळगावात आल़े कुटुंबियांनी दोघांचा शोध घेतला मात्र मिळून न आले नाहीत़ त्यांच्या विरूध्द पालकांनी दिलेल्या खबरीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. 
पिंप्राळा हुडकोतील मित्रांकडे दोघे
शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील गणेश शिरसाळे व दुष्यंत खैरनार हे रात्री गस्तीवर असताना त्यांना पोलीस ठाण्यातून खुलताबाद पोलीस आल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार दोघांनी गोपनीय बातमीदाराच्या मार्फत व मोबाईल लोकेशनच्या आधारावर दोघांचा शोध घेतला़ 
राजमालती, भारतनगरानंतर दोघे पिंप्राळा हुडकोत असल्याचे समजल़े त्यानुसार शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले व याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करून दोघांना पहाटे पाच वाजेच्या सुमारास खुलताबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल़े


खुलताबादच्या पथकाने घेतली मदत
खुलताबाद पोलिसांनी तक्रारीवरून दोघांचा शोध सुरू केला़ दोघांच्या मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यानंतर ते जळगावात असल्याची माहिती मिळाली. पोलीस हेडकॉस्टेबल काथार हे दोन कर्मचा:यांसह 13 रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास जळगावात आल़े खुलताबाद येथील पथकाने दोघांच्या शोधकामी शहर पोलिसांची मदत घेतली़

Web Title: In front of Verulayagul police of Verul before marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.