उपासनेचे फळ : रमजान ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 06:03 PM2020-05-28T18:03:35+5:302020-05-28T18:04:09+5:30

सुख आणि दु:ख हे मानवी जीवनाचे दोन पैलू आहेत. जेव्हा माणसावर संकट येते तेव्हा तो दु:खी होतो आणि जेव्हा ...

Fruits of Worship: Ramadan Eid | उपासनेचे फळ : रमजान ईद

उपासनेचे फळ : रमजान ईद

Next

सुख आणि दु:ख हे मानवी जीवनाचे दोन पैलू आहेत. जेव्हा माणसावर संकट येते तेव्हा तो दु:खी होतो आणि जेव्हा आनंद येतो तेव्हा तो समाधानी असतो. वर्षभरात आम्ही काही सण साजरा करतो जे आपल्या आनंदाचे स्रोत असतील? जेव्हा आम्ही आपल्या जीवनात सर्व प्रकारची चिंता आणि आर्थिक जबाबदाऱ्यांपासून काही क्षण मुक्त राहून आनंदाची वेळ घालवतो, त्याला सण म्हणतात. आपल्या जीवनात आनंदाचे सण साजरी करणे याचा मोलाचा स्थान आहे.
ईदुल-फित्र हा मुस्लिम बांधवांसाठी आनंदाचा मोठा उत्सव आहे, जो दरवर्षी रमजान महिन्याच्या उपवासानंतर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ईद नक्कीच आनंदाचा सण आहे पण यंदाच्या ईदमध्ये आपल्याला जबाबदार वृत्ती आणि दृढनिश्चयाने कोरोना महामारीला धैर्याने तोंड देण्याची आहे. जीवनात अनेक समस्या उद्भवतात, परंतु यामुळे निराश होता कामा नये. अशा परिस्थितीत काही लोक असे म्हणत आहेत की, आम्ही ईद साजरी करणार नाही. या विचारसरणीमागे देशप्रेम आणि मानवतेचा भाव आहे.
ईद हा आपल्या महिन्याभराच्या उपासनेबद्दल अल्लाहचे समोर नतमस्तक होउन आभार मानण्याचा दिवस आहे. ईद हा आपल्या गरीब बांधवांना मदत करण्याचा दिवस आहे. गरजू लोकांना आधार देण्याचा दिवस आहे. प्रेम सामायिक करण्याचा आणि तुटलेला संबंध जोडण्याचा दिवस आहे. या दिवशी आनंद व्यक्त करणे ही शरीयतची आज्ञा आहे. चांगले कपडे घालणे, सुगंध लावणे आणि गोड खाणे ही आपली परंपरा आहे. आपण बाजारात गेलो नाही, हे चांगले केले. वाचवलेले पैसे त्यांच्यावर खर्च करुन ईद साजरी करा ज्यांच्याकडे अद्याप औषध आणि खाण्यासाठी पैसे नाहीत. यापूर्वी तुम्ही अनेकवेळा ईद साजरी केली असेल. यंदाची ईद आपल्या जीवनाची पहिली आणि अनोखी ईद असेल. कारण दुसऱ्यांच्या आनंदासाठी त्याग करण्याचे सुख वेगळे असतात. आपल्याला नक्कीच मानसिक शांती आणि आत्मिक समाधानचा अनुभव मिळेल. कोरोना रूग्णांना आपल्या आनंदाचा एक भाग बनवा. त्यांचा द्वेष करु नका, त्यांच्याशी भेदभाव करू नका. त्यांना मदत करा. ज्यांचे प्रियजन या आजाराने ग्रस्त आहेत त्यांचे सांत्वन करा. या आनंदमय दिवशी घरीच नव्हे तर रुग्णालयात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसात ज्यांनी आपले प्रियजन हरवले आहे, त्यांचे दु: ख सामायिक करण्याचा प्रयत्न करा. टाळेबंदीने दारिद्र्य आणि बेरोजगारीलाही तीव्र केले आहे. त्यापासून प्रभावित लोकांना आपल्याला मदत करण्याची आवश्यकता आहे? ईदचा हादेखील महत्त्वाचा हेतू आहे. म्हणूनच ईदच्या नमाजच्या आधी सदाका-ए-फित्र अदा करण्यावर भर देण्यात आला आहे .आपण आपल्या गरीब शेजाºयांना आणि गरीब नातेवाईकांना ईदच्या आनंदात सहभागी केल्याशिवाय ईद साजरा करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ईदच्या दिवशी लोकांना नक्की भेटा परंतु थोड्या अंतरावर. पण हे अंतर मनाचे अंतर होऊ देऊ नका. आनंदी व्हा आणि लोकांसह आनंदात सहभागी व्हा .ईदच्या या आनंदमय दिवशी सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना मनापासून शुभेच्छा.
-काजी मुजम्मिलोद्दीन नदवी

Web Title: Fruits of Worship: Ramadan Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.