इंधन दरवाढीचा फटका : मालवाहतुकीचे दर व धान्याच्या किंमतीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 11:59 AM2018-09-09T11:59:34+5:302018-09-09T11:59:51+5:30

मालवाहतुकीच्या दरात १५ ते २० टक्के वाढ

 Fuel price hike: Increase in freight rate and price of grains | इंधन दरवाढीचा फटका : मालवाहतुकीचे दर व धान्याच्या किंमतीत वाढ

इंधन दरवाढीचा फटका : मालवाहतुकीचे दर व धान्याच्या किंमतीत वाढ

Next

जळगाव : दररोज वाढणारे इंधनाचे दर सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत असून यामुळे मालवाहतुकीचे दर, धान्याच्या किंमतीत वाढ होत आहे. दुसरीकडे किराणा माल, वाहनांचे भाडे यात थेट वाढ करता येत नसली तरी त्याचा फटका व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.
मालवाहतुकीच्या दरात १५ ते २० टक्के वाढ
डिझेल दरवाढीमुळे मालवाहतुकीच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. असे असले तरी २० दिवसांपूर्वी झालेल्या या दरवाढीनंतर आता पुन्हा लगेच दरवाढ करता येत नसल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. या २० दिवसात ५ पैशांंपासून ते ८० पैशांपर्यंत वाढ होत गेल्याने डिझेलने पंचात्तरी गाठली आहे. त्यामुळे लगेच दरवाढ करता येत नसल्याने वाढीव इंधन खर्चाचा बोझा मालवाहतूकदार सहन करीत आहे. यामुळे नफ्यात कोणतीही बचत होत नसून इंधनाचा खर्च, मजुरी, हमाली यातच सर्व कमाई जात असल्याचे मालवाहतूकदारांनी सांगितले. यात वाहनांच्या कर्जाच्या हप्ते मोठे असल्याने परवडत नसले तरी वाहन उभे राहू देता येत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
धान्याच्या किंमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ
मालवाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने धान्याच्या किंमतीवरही अप्रत्यक्षरित्या फरक पडत आहे. हळूहळू धान्याच्या किंमतीत ५ ते १० टक्क्यांनी वाढ होऊन २२५० ते २४०० रुपयांवर असलेल्या गव्हाच्या भावात वाढ होऊन ते २४०० ते २५०० रुपयांवर पोहचले आहेत.
किराणा व्यावसायिकांना फटका
किराणा मालाच्या वाहतुकीतही वाढ झाली असली तरी मालाची भाववाढ करता येत नसल्याने दररोज या व्यावसायिकांना फटका बसत आहे. मात्र काही दिवसात ही वाढ अटळ असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

डिझेल दरवाढीमुळे २० दिवसांपूर्वी मालवाहतुकीच्या भाड्यात १५ ते २० टक्क्यांनी वाढ करावी लागली. डिझेलचे दर वाढतच असल्याचे आता पुन्हा लगेत भाडेवाढ करता येत नसल्याने त्याचा फटका सहन करावा लागत आहे.
- पप्पू बग्गा, अध्यक्ष, जळगाव जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन.

मालवाहतुकीच्या दरात वाढ झाल्याने धान्याच्या किंमतीवरही मोठा परिणाम होत नसला तरी थोडाफार वाढ झाली आहे.
- प्रवीण पगारिया, अध्यक्ष, दाणाबाजार असोसिएशन.

मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली असली तरी किराणा मालाच्या किंमतीत एकदम वाढ करता येत नाही. त्यामुळे व्यावसायिकांनाच त्याचा फटका बसत आहे.
- ललित बरडिया, उपाध्यक्ष, फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र (फॅम).

डिझेल दरवाढीने प्रवासी भाड्यातही वाढ करावी लागणार आहे. आतापासूनच प्रवाशांनी पाठ फिरवली असून त्याचेही नुकसान सहन करवे लागत आहे.
- सतीश देशमुख, ट्रॅवल्स कंपनी संचालक.

Web Title:  Fuel price hike: Increase in freight rate and price of grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.