खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:18 AM2021-05-25T04:18:17+5:302021-05-25T04:18:17+5:30

फोटो जळगाव : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (वय २२, रा. तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी ...

Fugitive accused in attempted murder arrested | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला अटक

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला अटक

Next

फोटो

जळगाव : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या मोनुसिंग जगदीशसिंग बावरी (वय २२, रा. तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ सप्टेंबर २०२० रोजी मध्यरात्री भोलासिंग जगदीशसिंग बावरी गवळीवाड्यातील रवी हटकर यांच्या घरात घुसला होता. त्यावेळी रवी यांच्या घरात महिलाच होत्या. महिलेने त्याला हटकले असता त्याने घरातून पळ काढला. दरम्यान, हा प्रकार लक्षात आल्यानंतर रवी हटकर यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता जाब विचारला असता त्याचा राग आल्याने भोलासिंग जगदीशसिंग बावरी, वडील जगदीशसिंग हरीसिंग बावरी (वय-५०), आई सतकौर जगदीशसिंग बावरी (वय-४५), मोहनसिंग ऊर्फ मोनुसिंग जगदीशसिंग बावरी आणि भाऊ सोनुसिंग जगदीशसिंग बावरी यांनी हटकर यांच्या घरावर दगडफेक केली होती. यात उखा खंडू हटकर गंभीर जखमी झाले होते.

याप्रकरणी सुनीता हटकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात भोलासिंग बावरी, मोनुसिंग बावरी, सोनुसिंग बावरी, मोहनसिंग बावरी, जगदीशसिंग बावरी, सतकौर बावरी, समीर काकर, रिझवाना काल्या यांच्यासह इतर ४ ते ५ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मोनुसिंग ऊर्फ मोन्या जगदीशसिंग बावरी हा फरार होता. तो सोमवारी घरी आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार, उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, हेमंत कळस्कर, मुदस्सर काझी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, पोलीस चालक सुरेश अहिरे यांनी त्याला अटक केली.

Web Title: Fugitive accused in attempted murder arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.