कोविड सेंटरमधील फरार संशयित रुग्ण पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:05 PM2020-06-20T22:05:06+5:302020-06-20T22:05:51+5:30

केली तपासणी

Fugitive suspected patient from Kovid Center caught by Pachora police | कोविड सेंटरमधील फरार संशयित रुग्ण पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

कोविड सेंटरमधील फरार संशयित रुग्ण पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

Next


पाचोरा : जळगाव येथील कोविड सेंटर मधून फरार झालेला संशयित रुग्ण पाचोरा येथील जारगाव चौफुलीवर पाचोरा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यास पाचोरा येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, जळगाव येथील कोविड सेंटर मधून ८० वर्षीय कोरोना संशयित वृद्ध अचानक हॉस्पिटल मधून बेपत्ता झाल्याची घटना १९ रोजी घडली होती. याबाबत जळगाव जिल्हा पेठ पोलिसात रुग्ण बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान २० रोजी दुपारी १२ चे सुमारास सदर ८० वर्षीय वृद्ध पाचोरा येथील जारगाव चौफुलीवर पाचोरा पोलिसांना आढळून आला. पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश चोभे, पोकॉ किरण पाटील, वसंत पाटील, निलेश गायकवाड यांनी सदर वृद्धास ओळखून पाचोरा कोविड सेंटरला दाखल केले. डॉ. समाधान वाघ, डॉ, अमित साळुंखे यांनी त्यास तपासणी केली असता कोणत्याही प्रकारे लक्षण नसल्याची सांगितले. सदर वृद्ध हा नगरदेवळा येथील असल्याचे सांगण्यात येत असून त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचे कळते.

Web Title: Fugitive suspected patient from Kovid Center caught by Pachora police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.