आठ महिन्यांपासून फरार ट्रॅक्टर मालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:13 AM2021-07-04T04:13:22+5:302021-07-04T04:13:22+5:30

अमळनेर : पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेल्या ट्रॅक्टर मालकासह ट्रॅक्टर पकडण्यात आला. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस ...

Fugitive tractor owner arrested for eight months | आठ महिन्यांपासून फरार ट्रॅक्टर मालकास अटक

आठ महिन्यांपासून फरार ट्रॅक्टर मालकास अटक

Next

अमळनेर : पोलिसांनी गेल्या आठ महिन्यांपासून फरार असलेल्या ट्रॅक्टर मालकासह ट्रॅक्टर पकडण्यात आला. न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच अवैध वाळू वाहतूक करणारा नांद्रीचा ट्रॅक्टर पकडण्यात आला.

१६ ऑक्टोबर २०२० रोजी ट्रॅक्टर (एमएच१९बीजी ३१५३) च्या मालक अय्याज राजमोहमद बागवान याने ट्रॅक्टर पळवून नेला होता. तलाठी प्रकाश महाजन यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता व ट्रॅक्टरदेखील जप्त केला नव्हता. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी ट्रॅक्टरसह मालक अय्याज याला अटक करून न्यायालयात हजर केले.

न्या. अग्रवाल यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याचप्रमाणे हेडकॉन्स्टेबल संजय पाटील, हेडकॉन्स्टेबल मधुकर पाटील, हिरालाल पाटील यांनी नांद्री येथील महेश सुनील पवार यांचा ट्रॅक्टर (एमएच१९सीझेड ३४३८) जप्त केला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.

Web Title: Fugitive tractor owner arrested for eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.