अनैतिक व्यापार प्रकरणी फरार महिला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:14 AM2021-05-29T04:14:34+5:302021-05-29T04:14:34+5:30

१५ फेब्रुवारी रोजी गुन्हा घडल्यापासून आरोपी निर्मलाबाई उर्फ भुरी माॅ प्रशांत जाधव (५४, रा. इंद्रानगर, जामनेर रोड, भुसावळ) ही ...

Fugitive women's market in police custody in unethical trade case | अनैतिक व्यापार प्रकरणी फरार महिला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

अनैतिक व्यापार प्रकरणी फरार महिला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

Next

१५ फेब्रुवारी रोजी गुन्हा घडल्यापासून आरोपी निर्मलाबाई उर्फ भुरी माॅ प्रशांत जाधव (५४, रा. इंद्रानगर, जामनेर रोड, भुसावळ) ही फरार होती. या महिलेबाबत पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना गुप्त माहिती मिळाली. त्यावरून महिलेस २८ मे रोजी यावल तालुक्यातील अंजाळा शिवारातील जागृत हनुमान मंदिराजवळ सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. किशोर महाजन, पो.काॅ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे व पो.काॅ. प्रिया आरखराव, होमगार्ड विद्या लोखंडे यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व पो.ना. किशोर महाजन करीत आहेत.

Web Title: Fugitive women's market in police custody in unethical trade case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.