लोकमत रक्ताचं नातं उपक्रमाला भरभरून प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:17+5:302021-07-07T04:21:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाअंतर्गत मल्टीमीडिया प्रा. लि. या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडले. ...

Full response to the Lokmat Rakta Naat initiative | लोकमत रक्ताचं नातं उपक्रमाला भरभरून प्रतिसाद

लोकमत रक्ताचं नातं उपक्रमाला भरभरून प्रतिसाद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाअंतर्गत मल्टीमीडिया प्रा. लि. या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडले. या ठिकाणी जयदुर्गा ग्रुप अंतर्गत असलेल्या शाळांमधील शिक्षक, कर्मचारी तसेच अन्य रक्तदात्यांनी रक्तदान करून या महायज्ञामध्ये योगदान दिले आहे.

मंगळवारी सकाळी ११ वाजता महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, मल्टीमीडिया प्रा. लि. चे सीईओ सुशील नवाल, लोकमतचे कार्यकारी संपादक रवी टाले, सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर रक्तपेढीकडून रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी मल्टीमीडियाचे संचालक परितोष नवाल, कौशल नवाल, संचालिका सविता नवाल, सिनिअर मॅनेजर रत्नेशकुमार पांडेय, एचआर मॅनेजर मोरेश्वर डेठे, इव्हेंट मॅनेजर विवेक काळे, नवजीवन प्लसचे संचालक अनिल कांकरिया, नवरंग चहाचे संचालक अमरभाई कुकरेजा आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन मल्टीमीडियाचे संपादकीय प्रमुख भरत पाटील यांनी केले. गोळवलकर रक्तपेढीतर्फे डॉ. मकरंद वैद्य, तंत्रज्ञ मधुकर सैंदाणे, मदतनीस रामचंद्र पोतदार, उदय सोनवणे, जनसंपर्क अधिकारी अर्जुन राठोड यांनी सहकार्य केले.

कोट

लोकमतने रक्ताचे नाते जपून खऱ्या अर्थाने अशा उपक्रमाच्या माध्यमातून दुसऱ्यांचा जीव वाचविण्याचा एक आदर्श ठेवला आहे. असे शिबिर लोकांच्या जीवासाठी आवश्यक आहेत. लोकमतकडून हीच अपेक्षा आहे. लोकांनी रक्तदानासाठी पुढे यावे - ज्योती पाटील, शिक्षिका

आज आरटीओ कार्यालयात रक्तदान

लोकमत रक्ताचे नाते या उपक्रमाअंतर्गत शहरातील आरटीओ ऑफिसमध्ये सकाळी १० वाजेपासून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे व या चळवळीत सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी केले आहे.

Web Title: Full response to the Lokmat Rakta Naat initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.