गंभीर रुग्णांचे होतेय पूर्ण वेळ निरीक्षण - डॉ़ मधुकर गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:55 AM2020-07-02T00:55:37+5:302020-07-02T00:55:52+5:30
व्याधी असताना अंगावर काढणे धोकादायक
जळगाव : गंभीर रुग्णांवर पूर्णवेळ निरीक्षण, लवकर निदान अशा उपाययोजनांनी जळगाव जिल्ह्याचा मृत्यूदर घटत आहे, असा विश्वास सल्लागार, समन्वयक डॉ़ मधुकर गायकवाड (मुंबई) यांनी व्यक्त केला आहे़ आपल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यात अन्य व्याधी असलेल्या रुग्णांनी कोरोना अंगावर काढल्याने धोका अधिक वाढला, असेही ते म्हणाले़ ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आगामी नियोजन मांडले़ जिल्ह्याच्या सध्याच्या परिस्थितीबाबात माहिती दिली.
प्रश्न : जळगावच्या परिस्थिीबाबत काय वाटते?
डॉ़ गायकवाड : रुग्ण संख्या वाढली आहे. त्या दृष्टीने मार्गदर्शक सुचनांनुसार सर्व नियोजन व औषधोपचार सुरळीत पद्धतीने सुरू आहेत़ आपण आल्यानंतर पीपीई किटबाबत तसेच रुग्णांबाबत प्रशिक्षण दिले़ अनेक बाबी ज्या नव्हत्या त्या जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या़ आता बऱ्याच बाबी जसे डिजिटल एक्से, मॉनिटर्स, व्हँटीलेटर याबाबी रुग्णालयाला उपलब्ध झालेल्या आहेत़
प्रश्न : मृत्यूदर घटत नसल्याचे चित्र आहे का?
डॉ़ गायकवाड : असे नाही, आधी पाच ते सहा मृत्यू दिवसाला होत होते, ते दोन किंवा तीनवर आले आहेत़ ७ टक्यांवर मृत्यूदर आलेला आहे़
मनुष्यबळ कमतरतेचा मुद्दा आजही कायम आहे काय सांगाल?
याबाबत अधिष्ठाता व जिल्हाधिकारी सांगू शकतील़ मात्र, गंभीर रुग्णांना ज्या सुविधा जागेवरच देणे गरजेचे आहे, त्या सुविधा आम्ही जागेवरच उपलब्ध करून देत आहोत, सर्वांना तशा सूचना आहेत़ आॅक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णाला आॅक्सिजन काढून स्वच्छतागृहात जावे लागले तर पुढे अडचणी वाढतात, त्यामुळे बेडपॅन आम्ही उपलब्ध करून देतो़
डॉक्टर्स पूर्णवेळ, पूर्ण मेहनतीने, पूर्ण शर्थीचे प्रयत्न करून रुग्णांना बरे करण्यासाठी लढत आहेत़ लोकांनी सहकार्य करावे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक चांगले आहे़
- डॉ़ मधुकर गायकवाड, तज्ञ सल्लागार, समन्वयक, कोविड रुग्णालय