सपनाच्या शिक्षण पूर्ण करण्याच्या स्वप्नाला हातगाडीवर व्यवसाय करणाºया विनोदची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:53 PM2018-01-06T18:53:00+5:302018-01-06T18:58:45+5:30
धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील गृहिणीने लग्नानंतर शिक्षण पूर्ण करीत नेट परीक्षेत मिळविले यश
आॅनलाईन लोकमत
धरणगाव, दि. ६ : रिक्षा चालक वडिल आणि हातगाडीवर व्यवसाय करणाºया पतीच्या प्रोत्साहनाच्या बळावर धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील गृहिणी सपना पाटील यांनी नेटची परीक्षा पूर्ण करीत आपल्या स्वप्नपूर्तीचे पहिला टप्पा पूर्ण केला आहे.
अमळनेर तालुक्यातील चांदणी कुºहे येथील माहेरवाशिण असलेल्या सपना हिचे लग्न सात वर्षांपूर्र्वी कल्याणे खुर्द ता.धरणगाव येथील विनोद बाळूू पाटील या युवकाशी झाला. वडिल सुरत येथे रिक्षा चालक असल्याने परिस्थिती नुसार त्यांनी सपना यांना १२ वी पर्यत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी सपनाचे शिक्षित- होतकरु असलेल्या युवकाशी लग्न लावून दिले. विनोदनेही संसाराचा गाडा ओढण्यासाठी नोकरीच्या मागे न धावता जळगाव येथील बहिणाबाई चौकात अंडा-पावची हातगाडा सुरु केली. सपनाने पती विनोद, सासरे बाळू पाटील, सासू जनाबाई यांना अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करू देण्याची विनंती केली. सर्व परिवाराने प्रोत्साहन देत १२ वी नंतरचे शिक्षण माम सासरे डी.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे सुरु करण्यास सहमती दर्शविली. सपनाने बी.ए.,एम.ए.,एम.एड् चे शिक्षण पूर्ण करुन नेट ची तयारी सुरु केली. अभ्यास सुरु ठेवत नेट हिंदी विषयात त्या नुकत्याच उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशामुळे शिक्षण पूर्ण करून प्राध्यापक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आता सपना यांनी पी.एच.डी. करण्याची जिद्द ठेवली आहे. एका हातगाडीवर व्यवसाय करणाºया युवकाने पत्नीला शिक्षणासाठी दिलेले पाठबळ अनेकासांठी प्रेरणादायी ठरणारे आहे.