भारतीय जैन संघटनेचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचते- अरुणभाई गुजराथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 07:12 PM2019-06-29T19:12:32+5:302019-06-29T19:14:06+5:30
----- चोपडा : सर्वसामान्यांसाठी अनेक योजना शासनातर्फे राबविल्या जातात. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्थादेखील तळागाळातील जनतेला मदत करण्यासाठी पुढे येतात. ...
-----
चोपडा : सर्वसामान्यांसाठी अनेक योजना शासनातर्फे राबविल्या जातात. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्थादेखील तळागाळातील जनतेला मदत करण्यासाठी पुढे येतात. विविध शासकीय योजना, मदत सर्वसामान्यांपर्र्यंत पोहचतेच असे नाही. मात्र, भारतीय जैन संघटनेचे कोणतेही कार्य असले तरी ते सर्वसामान्यांपर्यंत पोहचते. हे संघटनेच्या कार्यकर्र्त्यांंच्या मेहनतीचे फळ आहे. भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते सर्वसामान्य परिस्थितीतून आलेले असल्याने त्यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचते, असे गौरवोद्गार विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी काढले.
भारतीय जैन संघटनेकडून सोशल मीडियावर आवाहन केल्यानुसार लोकसहभागातून गरीब, आदिवासी, मागासवर्गीय होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम २८ जून रोजी महिला मंडळ शाळेच्या हॉलमध्ये आयोजित केला होता. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्यासपीठावर चोपडा पीपल्स बँकचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, पंचायत समितीचे गटसमन्वयक तथा ग.स.संचालक देवेंद्र पाटील, चोपडा-निमगव्हाण गटातील केंद्रप्रमुख युवराज पाटील, प्रा.गोविंद गुजराथी, भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष क्षितिज चोरडिया, महिला मंडळ शाळांचे प्राचार्य सुनील चौधरी आदी उपस्थित होते.
सरस्वतीमातेच्या प्रतिमेस माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत संघटनेच्या सभासदांकडून करण्यात आले. यावेळी गट समन्वयक देवेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, भारतीय जैन संघटनेचे कार्य लोकाभिमुख आहे. मूल्यवर्धन करणारी शिक्षणपद्धती, नाला खोलीकरण, भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन, शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांना मोफत शिक्षण, बिझनेस डेव्हलपमेंट, महिला सक्षमीकरण असे अनेक उपक्रम संघटनेकडून राष्ट्रीय स्थरावर राबविले जातात. स्थानिक पातळीवर आरोग्य शिबिरे, अनाथ मुलांना कपडे, शैक्षणिक साहित्याचे वाटप यांसारखे विविध उपक्रम सुरूच असतात. त्यांचे हे कार्य तळागाळातील जनतेसाठी असते, असे बोलून त्यांनी संघटनेचे कौतुक केले.
या शाळांना वह्या वाटप
---
मॉडर्न गर्ल स्कूल, सद्गुरू कन्या विद्यालय, पालिका हायस्कूल, कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, महिला मंडळ विद्यालय, जिल्हा परिषद शाळा क्रमांक- १, २, व ३, मुस्तफा अँग्लो उर्र्दू स्कूल, प्रताप विद्यामंदिर नागलवाडी, कमला नेहरु वसतिगृह, सावता माळी वसतिगृह, महात्मा गांधी विद्यालय, सत्रासेन आश्रमशाळा, उमर्र्टी आश्रमशाळा, बोरअजटी आश्रमशाळा, जय श्री दादाजी हायस्कूल तांदळवाडी, जि.प.शाळा विषणापूर, जि.प.शाळा जिरायतपाडा, जि.प.शाळा कारखाना, सातपुडा आदिवासी जनता वसतिगृह, जि.प.कन्या विद्यालय आदी शाळांना मान्यवरांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.
या दात्यांकडून मदत
-
सुभाषचंद्र बरडिया, सुगनचंद बोरा, रमेश राखेचा, डॉ.तेजपाल चोरडिया, नरेश लोडाया, उमेदमल टाटिया, अॅड.अशोक जाधव, जीवनलाल ब्रह्मचा, दिलीप बरडिया, पारस आॅटो सेंटर, वामनराव फ्रूट सेल सोसायटी, नंदकिशोर देशमुख, रमेशभाई नागदेव, करसनदास नानाजीभाई मिठाईवाले, बाबूलाल बोथरा, दिनेश बरडिया, नवल भिकमचंदजी बरडिया, राजेंद्र मेहेर अडावद, ललित टाटिया, सुरेशचंद दर्डा, प्रा.गौतम छाजेड, सुनील प्रेमचंदजी बरडिया, शोभा चोपडा, गौतम सांड, विनोद पालीवाल, अनिल बुरड, संजीव बाविस्कर, प्रकाशचंद सुराणा, सुगनचंद सांड, चंद्रकांत जैन, अमृत आप्पा वाघ, ए.डी.चौधरी, डॉ.आर.टी. जैन, हेमंत छाजेड, धीरेंद्र जैन, नमन मोबाईल, निखिल भदाणे (पुणे), सुरेश राखेचा, अनुप जैन आदींनी मदत केली. त्यांचे सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी संघटनेचे सचिव दिनेश लोडाया, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल कोचर, तालुका उपाध्यक्ष विपुल छाजेड, कोषाध्यक्ष निर्मल बोरा, जितेंद्र बोथरा, दीपक राखेचा, आनंद आचलिया, आदेश बरडिया, अभय ब्रह्मचा, आकाश सांड आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय बारी तर आभार प्रदर्शन लतीश जैन यांनी केले.