चोपड्यात विद्यार्थ्यांनी गोळा केला पूरग्रस्तांसाठी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 09:01 PM2018-08-24T21:01:25+5:302018-08-24T21:02:27+5:30
पाच तासात जमविली आठ हजारांची रक्कम
चोपडा, जि.जळगाव : केरळमध्ये अतिवृष्टीमुळे झाल्याने महापुरात प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली आहे. शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडले असून त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चोपडा शहरातील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील सेवाभावी युवकांनी पुढाकार घेऊन मदत निधी संकलनाचे काम केले आहे. त्यांना संस्थेचे अध्यक्ष अॅड.संदीप पाटील, प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे, प्रा.एम.बी.हांडे, प्रा.बी.एस.हडपे ,मुख्याध्यापक नीळकंठ सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
शुक्रवारी पहिल्या दिवशी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय (कनिष्ठ व वरिष्ठ), शिक्षण शास्त्र महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय येथील परिसरात फिरून विद्यार्थ्यांकडून निधी संकलन करण्यात आले.
या निधी फेरीला विद्यार्थ्यांंनी आपापल्या परीने मदत केली. त्यात या विद्यार्थ्यांनी पाच तासात आठ हजार रुपयांचा निधी गोळा केला आहे. प्रा.प्रदीप पाटील, प्रा.संदीप भास्कर पाटील, प्रा.एम.एल.भुसारे, प्रा.शैलेश वाघ, प्रा.डी.एस.पाटील यांच्या सहकार्यातून महाविद्यालयीन प्रतिनिधी अनिल बाविस्कर, लोकेश लाटे, चेतन बाविस्कर, अक्षय पाटील, भुवनेश्वरी पाटील, सनी पाटील, अक्षय वैद्य, नरेंद्र मैराळे, कामिल तडवी, विश्वनाथ चौधरी, तन्वीर पिंजारी, भूषण सोनवणे, दिनेश पाटील, सिकंदर तडवी, लीलाधर बाविस्कर, छाया काविरे, शुभम तडवी यांनी निधी संकलनाचे काम केले.
२५ रोजी शहरातील मुख्य बाजारात निधी संकलनासाठी फेरी काढण्यात येणार आहे.
नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन युवकांनी केले आहे.
दरम्यान, सर्व निधी संकलन झाल्यानंतर केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी पाठविला जाणार आहे.