‘फंडामेंटल राँग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 12:53 PM2017-07-22T12:53:40+5:302017-07-22T12:53:40+5:30

पण 150 टन कचरा साठेर्पयत 1100 गाळेधारक काय करत होते, याचं उत्तर कोण देणार?

'Fundamental Rong' | ‘फंडामेंटल राँग’

‘फंडामेंटल राँग’

Next
लाईन लोकमतजळगाव, दि. 22 - ‘फंडामेंटल राँग’बाबत प्रत्येक नागरिकाने जागरुक राहिलेच पाहिजे. अस्वच्छतेच्या कार्यातले आपले योगदान कसे असावे, याच अनुभवाच्या कसोटीवर उतरलेले काही मार्ग आहेत. केवळ जनहितार्थ या मार्गाची थोडक्यात माहिती देत आहे.पहिला, राजमार्ग म्हणजे थुंकणे, त्याचेही दोन प्रकार आहेत. गुटखायुक्त थुंकणे आणि गुटखाविरहित थुंकणे. यातले गुटखाविरहित थुंकणे अगदी फालतू असते. पक्षनिधी गोळा करताना 11 रुपयांची पावती फाडावी, त्यातला प्रकार. गुटखायुक्त थुंकणे हे (क्वांटिटी वाईज) भरीव योगदान असते. गुटख्याऐवजी पान किंवा तंबाखूसुद्धा चालू शकेल. तिघांचेही कार्य तेच- रसवर्धन. या मार्गावरून चालताना काही नियम पाळावे लागतात. पहिला म्हणजे मावा किंवा गुटखा खाणा:याने भगवद्गीतेमधल्या स्थितप्रज्ञाप्रमाणे असावे. निर्विकार! लोक काय म्हणतील, इतरांना किती किळस वाटेल, अशा गोष्टींनी अजिबात विचलित होता कामा नये. खुर्चीवरून बसल्या जागी, खिडकीतून, रेल्वेच्या दारातून, बसच्या खिडकीतून, गाडीची काच खाली करून, रस्त्याने चालता चालता, जिन्यांमधल्या कोप:यांवर थिएटरपासून हॉस्पिटलर्पयत कुठल्याही भिंतीवर.. फरशीवर, यत्र-तत्र-सर्वत्र-कुठेही, केव्हाही पिचकारी मारण्याचे धैर्य अंगी असावे. आपली पिचकारी इतरांच्या अंगावर उडाली, तरी त्याची अजिबात शरम बाळगण्याचे कारण नाही. प्रसंग आल्यास आपणच त्याला उलट शिवीगाळ करायला हरकत नाही. अस्तु.इथल्या एका मोठय़ा व्यापारी संकुलातला कचरा आणि घाण बघून हतबद्ध झालेल्या आयुक्तांनी तडकाफडकी सा:या दुकानांना सील करण्याचे आदेश दिले. त्या सरशी सगळ्यांना अचानक स्वच्छतेचं महत्त्व पटलं. सफाईसाठी फी जमा झाली. मनपा कर्मचारी कामाला लागले आणि अवघ्या 7-8 तासांमध्ये गेली 15 वर्ष रखडलेलं स्वच्छतेचं काम मार्गी लागलं. पेपरमध्ये कौतुकाने बातमी आलीय- 7 तासात 150 टन कचरा हलवला! क्या बात है.. सुभानल्ला.पण 150 टन कचरा साठेर्पयत 1100 गाळेधारक काय करत होते, याचं उत्तर कोण देणार? मुळात असा अडचणीचा प्रश्न विचारणार कोण? एक तर स्वच्छतेबाबत आपली विचारसरणी अगदी सुस्पष्ट असते- कचरा, घाण करणं हे आपलं काम आहे आणि तो साफ करणं हे सरकारचं, नगरपालिकेचं काम आहे. एकमेकांच्या कामात दखल अजिबात द्यायची नाही.दुसरा मार्ग आहे प्लॅस्टिक मार्ग. सिनेमा, नाटक, सहल, ‘सांस्कृतिक’ कार्यक्रम. अशा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काहीतरी खाणे आणि पिणे. (कौटुंबिक पातळीवरील पिणे असा अर्थ घ्यावा.) मग त्या कार्यक्रमातून बाहेर पडताना आपली स्मृतिचिन्हे म्हणून वेफर्स, कुरकुरे, इत्यादींच्या प्लॅस्टिक पिशव्या रॅपर्स आणि पेप्सी, कोक पाणी वगैरेच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या तिथेच फेकून याव्या. अत्यंत विरागी वृत्तीने वागून खाणे संपताक्षणी जिथे आहोत तिथेच, शक्यतोवर आपल्याच पायांपाशी या प्लॅस्टिक पिशव्या आणि बाटल्या टाकून द्याव्या. सहलीला गेल्यावर तर प्रत्येकी किमान दीड किलो प्लॅस्टिक आपल्या शुभहस्ते डोंगरावर, नदीमध्ये पडेल, याची खबरदारी घ्यावी. पुण्य मिळतं!तिसरा मार्ग म्हणजे अन्नमार्ग. हा लग्नाच्या स्वागत समारंभांमध्ये विशेष करून वापरता येतो. ‘स्वरुचि भोजन’ याचा खरा अर्थ ‘रुचेल तोर्पयतच खावे- नंतर टाकून द्यावे’ असा आहे. इथे खाण्याचे अन्न आणि टाकून देण्याचे अन्न यांचे प्रमाण साधारणत: 30 ला 70 टक्के असे असावे. त्याचा फायदा असा की, कितीही आलिशान कार्यालय अथवा लॉन असलं, तरी त्याच्या मागच्या भिंतीपाशी फेकलेल्या, सडलेल्या अन्नाचे ढिगारे अव्याहतपणे तयार होत राहतात. हेच 30:70 चे प्रमाण हॉटेलमध्ये ठेवल्यास तिथेही असेच सडके अन्न गोळा होऊ शकते. आपल्या घरातले अन्नसुद्धा मोह न बाळगता वरचेवर फेकत राहावे. तेही कसे? तर जवळच्या जवळ रस्त्यावरती. हेच शिक्षण मुलांनाही बालपणापासूनच द्यावे.अशा प्रकारे आपली भूमिका चोख पार पाडून झाल्यानंतर सवडीने टाय वगैरे लावून ‘शहरातील वाढती अस्वच्छता आणि सरकारची उदासीनता’ अशा एखाद्या विषयांवरच्या परिसंवादात भाग घ्यावा- त्यात ‘स्वच्छ भारत’ची चेष्टा अवश्य करावी- जय हो!‘राईट’ हा शब्द इंग्रजीत दोन अर्थाने वापरला जातो. एक म्हणजे ‘बरोबर’ या अर्थी आणि दुसरा ‘हक्क’ या अर्थी. त्यामुळे ‘मूलभूत अधिकार’- फंडामेंटल राईटच्या जोडीने जशी ‘फंडामेंटल डय़ूटी’ आहे, तसंच ‘फंडामेंटल राँग’पण आहेच की! खरंच, काही मूलभूत चुकीच्या गोष्टी- फंडामेंटल राँग. आपण अगदी कटाक्षाने पाळतो. त्यातलीच एक म्हणजे अस्वच्छता. आज याची आठवण येण्याचं कारण म्हणजे नुकतीच जळगावच्या मनपा आयुक्तांनी राबवलेली धडक स्वच्छता मोहीम.- अॅड. सुशील अत्रे

Web Title: 'Fundamental Rong'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.