अ‍ॅण्टीजेन टेस्ट कीट खरेदीसाठी सहा आमदारांकडून निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 12:36 PM2020-08-27T12:36:11+5:302020-08-27T12:37:24+5:30

एकूण एक कोटी ३ लाख ९७ हजार रुपयांचा निधी

Funding from six MLAs for purchase of antigen test kits | अ‍ॅण्टीजेन टेस्ट कीट खरेदीसाठी सहा आमदारांकडून निधी

अ‍ॅण्टीजेन टेस्ट कीट खरेदीसाठी सहा आमदारांकडून निधी

Next

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठी अ‍ॅण्टीजेन टेस्ट कीट खरेदी करता याव्यात यासाठी जिल्ह्यातील सहा आमदर स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत निधी देणार आहेत. त्यानुसार आमदारांनी जिल्हा नियोजन समितीकडे पत्र दिले असून त्यांच्या एकूण एक कोटी ३ लाख ९७ हजार रुपयांच्या निधीतून अ‍ॅण्टीजन किट खरेदी करण्यात येणार आहे.
यंदा कोरोनामुळे जिल्हा नियोजन समितीला मिळणाऱ्या निधीत कपात करण्यात येऊन ३३ टक्केच निधी अर्थात जिल्ह्याला केवळ १२५ कोटी निधी मिळणार आहे. त्यातही नवीन कामे न करता कोरोनासाठी हा निधी राखीव ठेवण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार या निधीतून कोरोनासाठीच्या खर्चाला प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर आता आमदार स्थानिक निधीतूनही कोरोनासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी सहा आमदारांनी तसे पत्र दिले आहे.
आमदार व निधीची रक्कम
आमदार गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पत्र देऊन स्थानिक विकास निधीतून रॅपिड अँण्टीजेन कीट खरेदीसाठी २५ लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्याबाबत कळविले आहे. अशाच प्रकारे आमदार अनिल पाटील यांच्या २०.६५ लाख रुपयांच्या निधीतून अमळनेर मतदार संघात अ‍ॅण्टीजेन कीट खरेदी करण्यात येणार आहेत. आमदार चंद्र्रकांत पाटील यांच्या १७.४६ लाख रुपयांच्या मुक्ताईनगर मतदार संघात अ‍ॅण्टीजेन कीट खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या निधीतून पाचोरा-भडगाव मतदार संघात १५.१४ लाख रुपयांच्या अ‍ॅण्टीजेन कीट खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच आमदार संजय सावकारे यांच्या १३.१८ लाख रुपयांच्या निधीतून भुसावळ मतदार संघात अँण्टीजेन कीट खरेदी करण्यात येणार आहे. रावेर मतदार संघात आमदार शिरीष चौधरी यांच्या निधीतून १२.५४ लाख रुपयांच्या अ‍ॅण्टीजेन कीट खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. अशा प्रकारे सहा आमदारांनी एक कोटी तीन लाख ९७ हजार रुपयांच्या निधीतून अँण्टीजेन कीट खरेदी करण्याबाबत पत्र दिले आहेत.
चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयासाठीही मदत
चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयासाठी आपात्कालीन आधुनिक रुग्णवाहिका खरेदी, शववाहिनी खरेदी व ५० बेडसाठी आॅक्सिजन पाईपलाइन करण्याबाबत चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनीही जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
पूर्वीच्या निधीतून बचत झालेल्या रकमेतून अ‍ॅण्टीजन कीट
अ‍ॅण्टीजन कीटसाठी निधी खर्च करण्यासंदर्भातील परवानगीचे पत्र देण्यापूर्वी कोरोनासाठी आमदार निधीतून ५० लाखाच्या मर्यादेतील रक्कम आमदारांनी दिली होती. त्यातून कोरोनासाठी वेगवेगळ््या प्रकारची खरेदी झाली. त्यानंतर त्यातून शिल्लक राहिलेल्या रकमेतून अ‍ॅण्टीजन कीट खरेदीसाठी परवानगी मिळण्याबाबत आमदारांना जिल्हा नियोजन समितीकडून पत्र देण्यात आले होते. त्यानुसार आमदारांनी हा निधी खर्च करण्यासंदर्भातील पत्र दिले आहे.

Web Title: Funding from six MLAs for purchase of antigen test kits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव