राज्यातील आमदारांना २५८.७५ कोटींचा निधी वितरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 03:26 PM2023-04-27T15:26:45+5:302023-04-27T15:27:15+5:30

प्रत्येकी ७५ लाख, वार्षिक नियोजनानुसार १० टक्के वितरण

Funds of 258.75 crores distributed to MLAs in the state | राज्यातील आमदारांना २५८.७५ कोटींचा निधी वितरीत

राज्यातील आमदारांना २५८.७५ कोटींचा निधी वितरीत

googlenewsNext

कुंदन पाटील, जळगाव: वार्षिक नियोजनानुसार  जिल्ह्यातील ११ विधानसभा तर एका विधानपरिषद सदस्याला प्रत्येकी ७५ लाखांचा निधी राज्य शासनाने वितरीत केला आहे. जिल्ह्यातील १२ आमदारांना ९ कोटींचा निधी बिम्स प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आला आहे.

स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राज्यातील आमदारांसाठी २६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.हा निधी चार टप्प्यात वाटप होणार आहे. त्यानुसार डिसेंबर २०२३ पर्यंत ७० टक्के निधी वितरीत केला जाणार आहे. त्यानुसार २८८ विधानसभा सदस्य आणि ५७ विधानपरिषद सदस्यांना २५८.७५ कोटींचा निधी वितरीत केला जाणार आहे.

 

Web Title: Funds of 258.75 crores distributed to MLAs in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.