पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर बिबट्याच्या हल्ल्यात ठार बालकावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 02:58 PM2017-12-07T14:58:57+5:302017-12-07T15:03:01+5:30

बिबट्याच्या हल्ल्यानंतर तहसीलदारांना घातला घेराव

Funeral ceremony for the baby killed in Leibba's assault after the assurance of Guardian Minister | पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर बिबट्याच्या हल्ल्यात ठार बालकावर अंत्यसंस्कार

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर बिबट्याच्या हल्ल्यात ठार बालकावर अंत्यसंस्कार

Next
ठळक मुद्देनाशिक, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील वन विभागाचे कर्मचारी दाखलपालकमंत्र्यांनी दिले बिबट्याला पकडण्याचे आश्वासननातेवाईकांचा मालेगाव तहसीलदारांना घेराव

आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.७ : नरभक्षक बिबट्याने कुणाल प्रकाश अहिरे (७) या पहिलीत जाणाºया बालकाला उचलून नेऊन ठार केल्यानंतर अंत्यसंस्कारावेळी नातेवाईकांनी बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याची तहसीलदारांनी फोनवरून बोलणे करून दिले. त्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुणालवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
साकूर-देवघट शिवारात बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास नरभक्षक बिबट्याने कुणाल प्रकाश अहिरे या बालकाला उचलून नेत ठार केले होते.
साकूर- देवघट हे मालेगाव तालुक्यात असले तरी चाळीसगाव-मालेगावच्या हद्दीवर आहे. रतन शंकर बागुल यांचे साकूर शिवारात शेत आहे. शेतातील झोपडीत त्यांचा नातू (मुलीचा मुलगा) कुणाल अहिरे हा झोपण्यासाठी जात होता. त्याचवेळी बिबट्याने त्याच्यावर झडप मारून त्याला ओढत नेले. शोधाशोध केल्यावर हा प्रकार उघड झाला होता. मयत कुणालची आई दिव्यांग आहे. त्याला वडील नाहीत. एक मोठा भाऊ आहे.
शोधकार्यात सापडले धड
रात्री १०.५० वाजेच्या सुमारास कुणाल याचे धड एका शेतात आढळून आले होते. मयत कुणाल याचे शवविच्छेदन झाल्यानंतर शववाहिकेत मृतदेह आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी बिबट्याला जेरबंद करीत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला. मालेगाव तहसीलदारांनी वनविभाग, पोलीस व प्रशासनातर्फे सुरु असलेल्या शोध कार्याची माहिती दिली. मात्र नातेवाईक आपल्या मागणीवर ठाम होते.
पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन
त्यानंतर मालेगाव तहसीलदारांनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत नातेवाईकांचे बोलणे करून दिले. त्यांनी नातेवाईकांसोबत चर्चा करीत वनविभागाच्या शोध कार्याची माहिती दिली. तसेच बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी कुणाल याच्यावर अंत्यसंस्कार केले.
नाशिक, जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील कर्मचारी दाखल
घटनेनंतर नाशिकसह जळगाव व अहमदनगर जिल्ह्यातील वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. तसेच काही शॉर्पशुटर तसेच पिंजरे देखील या भागात लावण्यात आले आहेत.

Web Title: Funeral ceremony for the baby killed in Leibba's assault after the assurance of Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.