नायक विलास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2017 12:31 PM2017-04-27T12:31:03+5:302017-04-27T12:31:03+5:30

अल्पशा आजाराने मंगळवारी त्यांचे निधन झाले होते

The funeral of the government on Nayak Vilas Patil | नायक विलास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नायक विलास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next

ऑनलाइन लोकमत

नेरी, जि. जळगाव, दि. 27 - भारतीय सैन्य दलातील नायक विलास पाटील यांचे यांच्यावर गुरुवारी सकाळी 10 वाजता जामनेर तालुक्यातील नेरी या त्यांच्या मूळ गावी  शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. अल्पशा आजाराने मंगळवारी त्यांचे निधन झाले होते.
यावेळी भारतीय सैन्यातील सुभेदार एस.के. स्वाई यांच्या पथकाने मानवंदना दिली. जामनेर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नजीर शेख, तहसीलदार नामदेव टिळेकर यांनीदेखील याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण केली.
विलास पाटील यांचे पार्थिव एका विशेष विमानाने दिल्लीहून औरंगाबाद येथे आणण्यात आले होते. सैन्यातील काही अधिकारी बुधवारपासूनच याठिकाणी तळ ठोकून होते.
उपस्थितांना आले गहिवरून
अवघ्या 10 वर्षाचा ईशान व 6 वर्षाचा विपूल या चिमुकल्यांनी आपल्या पित्याला अग्नीडाग दिला. त्यावेळी उपस्थित सर्व नागरिकांना गहिवरून आले. 
 

Web Title: The funeral of the government on Nayak Vilas Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.