मजरी हिंगोणे येथे हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 02:27 PM2019-04-26T14:27:48+5:302019-04-26T14:29:33+5:30
दंगलीचा गुन्हा दाखल
चोपडा : मुलगी आजारी आहे, म्हणून सासरच्या मंडळींसोबत नांदविण्यास पाठविले नाही या कारणावरून हाणामारी करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना तालुक्यातील मजरी हिंगोणे या गावी घडली. दरम्यान, आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
याबाबत पोलिसांच्या माहितीनुसार मजरे हिंगोणे ता. चोपडा येथे २५ रोजी एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आशाबाई रामसिंग भिल रा. मजरे हिंगोणे यांची मुलगी आजारी आहे म्हणून नांदविण्यास पाठविले नाही म्हणून राग आल्याने पाच जणांशी हुज्जत घालत मारहाण केली म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आशाबाई रामसिंग भिल यांच्या फिर्यादीवरून मुरलीधर अर्जुन भिल, निर्मलबाई मुरलीधर भिल, चंद्रकांत मुरलीधर भिल, गुड्डीबाई मच्छिंद्र भिल व मच्छिंद्र भिल सर्व रा. मजरे हिंगोणे यांच्याविरुद्ध गुरनं. २९/२०१९ भादंवि कलम ४४८, ३२३, ५०४, ५०६, १४३ व १४७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अद्याप कोणत्याही आरोपीस अटक करण्यात आली नाही.
या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार काशीनाथ पाटील हे करीत आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे.