स्नेहजा रुपवते यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 06:34 PM2019-05-14T18:34:34+5:302019-05-14T18:50:38+5:30

विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या ज्येष्ठ कन्या व माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या स्नुषा तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्नेहजा प्रेमानंद रुपवते यांच्यावर खिरोदा येथे मंगळवारी शोकाकुल वातावरणात बौद्ध धम्म पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

Funeral in mourning atmosphere on Snehaj Rupesh | स्नेहजा रुपवते यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

स्नेहजा रुपवते यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

googlenewsNext
ठळक मुद्देखिरोदा येथे मुलींनी दिला अग्नीडागउपस्थितांना आले गहिवरूनबौद्ध धम्म पद्धतीनुसार विधीश्रद्धांजली सभेत दिला स्मृतींना उजाळा

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या ज्येष्ठ कन्या व माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या स्नुषा तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या स्नेहजा प्रेमानंद रुपवते यांच्यावर खिरोदा येथे मंगळवारी शोकाकुल वातावरणात बौद्ध धम्म पद्धतीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. स्नेहजा रुपवते यांच्या कन्या बंधमुक्ता खान व उत्कर्षा सालीयान यांनी अग्निडाग दिला. यावेळी सर्वांनाच गहिवरून आले.
स्नेहजा रुपवते या माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या कन्या तथा भाची यज्ञाच्या लग्न समारंभासाठी खिरोदा येथे आल्या होत्या. ११ मे रोजी लग्नकार्य करून १२ रोजी मुंबईकडे आपल्या कुटुंबासह निघाले असता पाळधी गावाजवळ झालेल्या अपघातात त्या मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यानंतर १४ रोजी खिरोदा येथे स्नेहजा रुपवते यांच्यावर बौद्ध धम्म रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे येथील बौद्ध महासभेचे अध्यक्ष के.डी.मुटघरे व बौद्धाचार्य बी.डी महाले, राजेंद्र अटकाळे यांनी सामूहिक बुद्ध वंदना म्हणत अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले.
यावेळी झालेल्या श्रद्धांजली सभेत माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, रिपाईचे विजय वाकचौरे, आमदार डॉ.सुधीर तांबे, अकोला येथील अशोक भांगरे, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, मुक्ताईनगर येथील प्राचार्य व्ही.आर.पाटील, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस विनायकराव देशमुख, माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करताना स्नेहजाताई या म.गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये समरस झालेल्या होत्या, त्यांनी दादासाहेब रूपवते व प्रेमानंद रूपवते यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वधर्म समभाव, सामाजिक व सांस्कृतिक चळवळ पुढे चालवली होती, याबद्दल सर्वांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, मसाका चेअरमन शरद महाजन, प्रांताधिकारी अजित थोरबोले, सावदा माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, रावेरचे हरीश गनवाणी, बी.आर.कदम, क्रांतीबाई कोळगे, स्मृतीगंधा गायकवाड, युगप्रभा बल्लाळ यांच्यासह जळगाव, नगर जिल्ह्यातील व मुंबई येथील स्नेहीजन व परिवारातील सदस्य अंत्यविधीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आईच्या कुशीत स्नेहजा विसावल्या
ज्या जनता शिक्षण मंडळाच्या प्रांगणामध्ये कुसुमताई मधुकरराव चौधरी यांना अग्नीडाग देण्यात आला होता, त्याच ठिकाणी त्यांच्या कन्या स्नेहजा रुपवते यांना यांना अग्नीडाग देण्यात आला. त्यामुळे एकप्रकारे आईच्या कुशीतच स्नेहजा या विसावल्या, अशी भावना व्यक्त करत याची आठवण करून देत असताना स्नेहजा यांचे बंधू माजी आमदार शिरीष चौधरी यांचा कंठ दाटून आला होता.

Web Title: Funeral in mourning atmosphere on Snehaj Rupesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.