देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 06:33 PM2020-07-09T18:33:06+5:302020-07-09T18:33:13+5:30
पहूर येथील प्रकार : विविध मागण्यांचे निवेदन देताना पदाधिकाऱ्यांनी केली एकच गर्दी
पहूर, ता. जामनेर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पहूर येथे आल्यानंतर विविध मागण्यांसाठी निवेदन देण्याकरीता पदाधिकाऱ्यांची झुंबड उडाल्याने सोशलडिस्टन्सिंगचे तीनतेरा झाल्याचे दिसून आले. यादरम्यान पहूर भाजपच्या वतीने खते उपलब्ध होऊन काळाबाजार थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
जळगावहून -औरंगाबाद जातांना काही वेळासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आमदार गिरीश महाजन पहूर येथे थांबले. निवेदने देण्यासाठी पदाधिकाºयांनी एकच गर्दी केल्याने कोरोना संक्रमणाचा विसर पडल्याचा प्रत्यय आला.
दरम्यान, सरकारने शेतकºयांना बांधावर खत देण्याचे सांगितले, पण बांधावर तर नाहीच पण दुकानांमधूनही खत मिळत नाही. काळाबाजार होत आहे. हे तात्काळ थांबवावे व सबंधित व्यापाºयांविरुद्ध कार्यवाही करावी. तसेच सरसकट कर्जमाफी मिळावी, अशा आशयाचे निवेदन फडणवीस यांना देण्यात आले.
कृउबा समिती सभापती संजय देशमुख, भाजप तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज प्रमुख रामेश्वर पाटील, नगरसेवक दीपक तायडे, माजी जि.प सदस्य राजधर पांढरे, अरविंद देशमुख, ललित लोढा, भारत पाटील संदीप बेढे, संतोष चिंचोले यांच्यासह पदाधिकाºयांनी पहूरच्या भाजपच्या वतीने हे निवेदन दिले आहे.