बंद स्टॉर्च प्रकल्पाचे भविष्य अंधकारमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 03:57 PM2020-06-21T15:57:44+5:302020-06-21T15:57:50+5:30

जामनेर : मालदाभाडी, ता. जामनेर येथील स्टॉर्च प्रकल्प गेल्या सहा महिन्यापासुन बंद असून उपासमारीला कंटाळुन कामगारांनी स्थलांतर केले. व्यवस्थापनाने ...

The future of the closed starch project is bleak | बंद स्टॉर्च प्रकल्पाचे भविष्य अंधकारमय

बंद स्टॉर्च प्रकल्पाचे भविष्य अंधकारमय

googlenewsNext

जामनेर : मालदाभाडी, ता. जामनेर येथील स्टॉर्च प्रकल्प गेल्या सहा महिन्यापासुन बंद असून उपासमारीला कंटाळुन कामगारांनी स्थलांतर केले. व्यवस्थापनाने कोणतीही पुर्व सुचना न देता प्रकल्प बंद केल्यानंतर कामगारांनी लोकप्रतिनीधीसह कामगार आयुक्त व प्रशासनाकडे गाºहाणे मांडले मात्र काहीही उपयोग झाला नाही.
खाजगी तत्वावरील स्टॉर्च प्रकल्पात तालुक्यातील सुमारे पाचशे कर्मचारी कायम म्हणुन सेवेत होते. या व्यतिरीक्त रोजंदारीवर सुमारे दोनशे कामगार काम करीत होते. जानेवारीत व्यवस्थापनाने प्रकल्प बंद केला. कामगारांनी त्यावेळी आमदार गिरीश महाजन यांना भेटुन व्यवस्थापनाशी बोलुन तोडगा काढण्याबाबत साकडे घातले होते.
प्रकल्प सुरु होईल या आशेवर कामगार थांबुन होते, मात्र कोणतीही हालचाल होत नसल्याचे पाहुन आर्थिक विवंचनेतील कामगारांनी स्थलांतराचा निर्णय घेतला.
सुरक्षा रक्षक कामावर असतानाही वेतन नाही
प्रकल्प बंद झाल्यानंतही येथे सुमारे २६ सुरक्षा रक्षक कार्यरत असुन व्यवस्थापनाने सुरुवातीला काही महिने त्यांना वेतन दिले. मात्र फेब्रुवारीपासुन वेतन मिळण्यात अडचण येत असल्याने त्यांनी व्यवस्थापकांशी संपर्क साधला. आधी रोखीने वेतन दिले जात होत, नंतर बँके मार्फत करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, बँकांना प्रकल्पाची खाती गोठविल्याची माहिती सुरक्षा रक्षकांनी दिली. वेतनाची शास्वती नसल्याने सुरक्षा रक्षकांनी पोलिसांकडे पत्र दिले.
न्याय मिळण्याची कामगारांची मागणी
प्रकल्पाचे संचालक फिरकुनही पाहत नसल्याने कामगार आयुक्तांनी चौकशी करुन कामगारांना न्याय मिळवुन देण्याची मागणी होत आहे. एकिकडे शासन लॉकडाऊन काळात कामगारांच्या हिताचे निर्णय घेत असतंना स्टॉर्च प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.

Web Title: The future of the closed starch project is bleak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.