हिंदी भाषेचे भवितव्य उज्ज्वल-प्रा.विवेकमणी त्रिपाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:26 IST2020-09-14T15:26:14+5:302020-09-14T15:26:53+5:30
भविष्यात चीनमध्येच नव्हे तर इतर राष्ट्रांमध्येही हिंदी भाषेचे भविष्य उज्ज्वल असणार आहे.

हिंदी भाषेचे भवितव्य उज्ज्वल-प्रा.विवेकमणी त्रिपाठी
भुसावळ : भविष्यात चीनमध्येच नव्हे तर इतर राष्ट्रांमध्येही हिंदी भाषेचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. विदेशी पर्यटक भारतातमध्ये येथील संस्कृती, साहित्याचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतात. एवढेच नव्हे तर ते भारतात येण्याआधी हिंदी भाषा शिकण्यासाठी उत्सुक असतात, असे प्रा.विवेकमणी त्रिपाठी (इन्स्टिट्यूट फॉर इंटरनेशनल एज्युकेशन ग्वांगडोंग युनिव्हर्सिटी आॅफ फॉरेन स्टडीज, चीन) यांनी सांगितले.
पी.के.कोटेचा महिला महाविद्यालयातील हिंदी विभाग व कलामंडळ अंतर्गत हिंदी सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. उपप्राचार्या डॉ.शिल्पा पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
प्रा.त्रिपाठी यांनी चीनमध्ये हिंदी भाषेचा विस्तार यावर सांगितले की, जगाच्या पाठीवर अनेक भाषा बोलल्या जातात. त्यात व्यापारी भाषा म्हणून इतर भाषांचा विचार केला जातो, पण हिंदी भाषा अशी एकमेव भाषा आहे जी प्रेमाची भाषा म्हणून ओळखली जाते. भारतीय संस्कृती खूप महान आहे. चीनमधील विचारवंत भारतीय संस्कृतीचा आदर करतात त्याचप्रमाणे अनुकरणसुध्दा करतात.
डॉ.गिरीष कोळी यांनी प्रास्ताविक केले. स्वागत व परिचय कला मंडळ प्रमुख प्रा.नीलेश गुरूचल यांनी केले. सूत्रसंचालन निशा पाटील, तर आभार डॉ.सरोज शुक्ला यांनी मानले.