तिसऱ्या लाटेवर जि.प.निधीचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:12 AM2021-07-04T04:12:28+5:302021-07-04T04:12:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदा जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजनकडून मिळणाऱ्या निधीवर आधीच संकटे आली असताना आता तिसरी लाट ...

The future of ZP fund on the third wave | तिसऱ्या लाटेवर जि.प.निधीचे भवितव्य

तिसऱ्या लाटेवर जि.प.निधीचे भवितव्य

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यंदा जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजनकडून मिळणाऱ्या निधीवर आधीच संकटे आली असताना आता तिसरी लाट आल्यास नियोजन अधिक विस्कळीत होणार आहे. यात ज्या कामांना दरवर्षी कोट्यवधींचा निधी मिळत होता. त्याच कामांवर आता मर्यादा आल्याने जुनीच देणी आधी द्या व नंतरच कामे घ्या, अशी स्थिती आहे.

कोरोनामुळे जिल्हा परिषदेच्या २०२० - २१ तसेच २०२१- २२ या दोन वर्षांच्या निधीला कात्री लागली आहे. यात आरोग्य विभागावर अधिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे दोन वर्षात अपेक्षित कामे पूर्ण न झाल्याने सदस्यांसमोरही एक पेच निर्माण झाला आहे. कामांच्या नियोजनासाठी मध्यंतरी जिल्हा परिषदेमध्ये दररोज बैठका पार पडल्या, पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचीही भेट घेतली होती. मात्र, आता तिसऱ्या लाटेचे भाकित वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार पुन्हा नवीन आदेश येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आरोग्य केंद्रांमुळे दिलासा

या निधीत प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या दुरूस्तीसाठी ३ कोटी ७५ लाखाचे नियोजन करता येणार आहे. ग्रामपंचायत जनसुविधा कामांसाठी २ कोटी ४० लाख, नागरी सुविधांसाठी २ कोटी ५० लाख, यात्रास्थळ विकासासाठी २ कोटी ४० लाख, अंगणवाडी बांधकामसाठी ९ कोटीचे नियोजन करता येणार आहे. यासह कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी १७ कोटी,पाटचाऱ्यांसाठी १२ कोटी, ग्रामीण रस्त्यांसाठी ९, लघू पाटबंधारे यांच्या भुसंपादनासाठी ९ कोटी, रस्त्यांची मोठी बांधकामे २४ कोटी असे नियोजन करता येणार आहे.

Web Title: The future of ZP fund on the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.