किनगाव खुर्द येथे ग्रा. पं.मार्फत मिनी ट्रॅक्टर व ट्रॉली लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:21 AM2021-08-12T04:21:13+5:302021-08-12T04:21:13+5:30

पंधराव्या वित्त आयोगातून हे ट्रॅक्टर घेऊन किनगाव खुर्द ग्रामपंचायतीने या ट्रॅक्टरचे लोकार्पण केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी ...

G. at Kingaon Khurd. Dedication of mini tractor and trolley through Pt | किनगाव खुर्द येथे ग्रा. पं.मार्फत मिनी ट्रॅक्टर व ट्रॉली लोकार्पण

किनगाव खुर्द येथे ग्रा. पं.मार्फत मिनी ट्रॅक्टर व ट्रॉली लोकार्पण

Next

पंधराव्या वित्त आयोगातून हे ट्रॅक्टर घेऊन किनगाव खुर्द ग्रामपंचायतीने या ट्रॅक्टरचे लोकार्पण केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून किनगाव खुर्द ग्रामपंचायतीचे सतत १७ वर्षे सरपंच राहिलेले शुक्राम व्यंकट पाटील व पंचायत समितीचे सदस्य उमाकांत रामराव पाटील होते.

उद्घाटन शुक्राम व्यंकट पाटील यांनी केले. शुक्राम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत पाटील, रवींद्र ठाकूर, किनगाव बुद्रुकचे माजी सरपंच टिकाराम मुरलीधर चौधरी, ग्रा. पं.चे माजी सदस्य बापू साळुंके, माजी उपसरपंच विनोद कोळी, विजय सपकाळे, श्रावण कोळी, शांताराम कोळी, उत्तम महाजन, माजी सरपंच निंबा तायडे, चंद्रकांत विठ्ठल चौधरी, जुबेर शहा, डॉ. योगेश पालवे, संजय वराडे, जगदीश कोळी, संतोष कोळी, किनगाव खुर्दचे सरपंच भूषण पाटील, उपसरपंच शरद अडकमोल, ग्रा. प. सदस्य प्रशांत तायडे, बबलू कोळी, अनिता धनगर, अनिल पाटील, शाबरी तडवी, सीमा पाटील, राजमाला सपकाळे, हमिदा पिंजारी, ग्रामसेवक भोजराज फालक, किनगाव बुद्रुकच्या सरपंच निर्मला पाटील, उपसरपंच लुकमान कलंदर तडवी, विजय वारे, किरण सोनवणे, लोकेश महाजन, मेहमूद शेख, सावित्रीबाई नायदे, प्रमिला पाटील, साधना चौधरी, स्नेहल चौधरी, भारती पाटील, सायरा तडवी, किनगाव बुद्रुकचे ग्रामविकास अधिकारी प्रदीप धनगर, संजय सयाजीराव पाटील, लतीफ तडवी, युवराज झांबरे, बाळू पाटील आदी उपस्थित होते. राहुल सुरेश सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: G. at Kingaon Khurd. Dedication of mini tractor and trolley through Pt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.