पुरात वाहुन गेलेल्या बेपत्ता गजाननचा मृतदेह सापडला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 06:50 PM2019-06-29T18:50:52+5:302019-06-29T18:51:26+5:30
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची सांत्वनपर भेट
कुºहाड ता.पाचोरा- येथुन जवळच असलेल्या कळमसरा येथील शेतकरी सिताराम देवचंद वाघ व गजानन एकनाथ वाघ हे शुक्रवारी दुपारी मुसळधार पाउस सुरु असल्यामुळे शेतातुन बैलगाडीसह घरी परतत असतांना एकुलती शिवारातील लोंढवे नाल्याच्या पुरात बैलगाडीसह वाहुन गेले. त्यापैकी सिताराम वाघ हे झाडाच्या मुळीचा आधार घेऊन बचावले. तर गजानन वाघ हे वाहून गेले. शासकिय यंत्रणा ,सरपंच निकम व ग्रामस्थ हे या युवकाचा शोध घेत होते, दुसऱ्या दिवशी शोधकार्यात हा युवक नाल्यापासुन काही अंतरावर दुपारी अकरा वाजता सापडला.
जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची सांत्वनपर भेट
शनिवारी दुपारी गिरीष महाजन यांनी जिल्हधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डाँ.पंजाबराव उगले, पाचोरा प्रांत राजेंद्र कचरे व तहसिलदार कैलास चावडे यांचेसोबत गजाननच्या परिवाराला सांत्वनपर भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. सदर मयताच्या परिवारास मुख्यमंत्री सहायता निधीतुन चार लाख व बैलगाडी व गोºह्याची नुकसान भरपाई म्हणून २५ हजाराचा धनादेश यावेळी देण्यात आला. तसेच या लोंढवे नाल्यावर पुल बांधुन देण्याचे आश्वासन महाजन यांनी दिले. दरम्यान, मयतावर तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.