सभेत गाजले मक्तेदार नगरसेवक
By admin | Published: March 1, 2017 12:22 AM2017-03-01T00:22:36+5:302017-03-01T00:22:36+5:30
सफाई ठेक्याचा हप्ता वरिष्ठांर्पयत : अश्विनी देशमुख यांचा आरोप
जळगाव : मनपाच्या महासभेत शौचालयांच्या ठेक्याच्या विषयावरून भाजपाचे सदस्य व महापौरांमध्ये वाद झाल्याने चिडलेल्या महापौरांनी आरोग्यच्या ठेकेदार नगरसेवकांची नावेच जाहीर करतो, माङयाकडे सर्वाची यादी आहे, असा इशारा दिल्याने खळबळ उडाली. तर याच विषयातील चर्चेत झालेल्या सफाई ठेक्यांबाबत 3500 तक्रारींचा उल्लेख आपल्याबाबतच असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी सफाई मक्तेदारांकडून पार वरिष्ठ अधिका:यांर्पयत हप्ते पोहोचविले जात असल्याचा आरोप केला. दरमहा अडीच लाख या हप्त्यांवर खर्च केले जात असल्याचा व आपल्यालाही तक्रारी न करण्यासाठी तडजोडीची ऑफर दिल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.
मक्तेदार नगरसेवक
मनपाच्या सर्व 57 सार्वजनिक
नावांबाबत उत्सुकता
देशमुख यांनी केलेल्या आरोपांबाबत नगरसेविका लता मोरे यांनी सभागृहात हा विषय समजला नाही. देशमुख यांच्याकडे कोणत्या पक्षाचे नेते गेले होते, असा सवाल केला. त्यावर सभागृहात हंशा पसरला. महापौरांनी मलाही समजले नाही. आपण यासाठी वेगळी महासभा बोलवू, असे सांगत विषय संपविला. मात्र सभा संपल्यावरही या आरोपांबाबत मनपा वतरुळात चर्चा सुरू झाली. याबाबत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला. मात्र आरोग्य निरीक्षकांपासून वरिष्ठ अधिका:यांर्पयत हप्ता पोहोचविला जात असल्याचे सांगितले.
शौचालयांच्या विषयावरील चर्चेतच कैलास सोनवणे यांनी आधीच्या सफाईच्या ठेक्यांबाबत तक्रारी नव्हत्या. आता स्वत:च्या वॉर्डात दुस:यांनी ठेका घेतल्याने 3500 तक्रारी करतात. पैसे मागण्यासाठी हे प्रकार होतात, असे सांगत भाजपाचे पृथ्वीराज सोनवणे यांना उद्देशून तुमच्याच भागात असे प्रकार होत असल्याचा टोला लगावला. त्यावर पृथ्वीराज सोनवणे यांनी मग त्यांचे नावही जाहीर करा, असे सांगितले. या विषयात लगेच बोलण्याची संधी न मिळालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी टीडीआरच्या विषयावरील चर्चेवेळी हा आधीचा विषय उपस्थित केला. कैलास सोनवणे यांनी 3500 तक्रारींचा उल्लेख केला. त्यांचा रोख माङयाचकडे होता. कारण मीच 3500 तक्रारी केल्या असल्याचे सांगत सोनवणे यांना चॅलेंज करते, या क्षणाला माङयाकडे व्हिडिओ व ऑडिओ क्लिपिंग आहेत. त्यात तक्रारी न करण्यासाठी व तडजोड करून घ्या, पैसे कमवा, असे सांगण्यासाठी कोण कोण अधिकारी, पक्षाचे नेते, ठेकेदार आले होते ते कळेल. दरमहा अडीच लाख रुपये या सफाई ठेकेदारांकडून खालपासून अगदी वरिष्ठ अधिका:यांर्पयत पोहोचविले जातात. विषय सेटल करून घ्या, अशी ऑफरही देऊन गेल्याचा आरोप केला. त्यावर कैलास सोनवणे यांनी मी त्यात आहे का? अशी विचारणा केली. या वेळी भाजपाचे गटनेते सुनील माळी यांनी बोलण्याचा प्रय} करताच सोनवणे यांनी तुम्ही मला शिकवायचे नाही, असे बजावले. महापौरांनी मात्र विषयांतर होत असल्याचे सांगत विषय मिटविला.