जळगाव जिल्हा परिषदेचा पंचायत राज पुरस्काराने गौरव
By admin | Published: April 14, 2017 12:39 PM2017-04-14T12:39:33+5:302017-04-14T12:39:33+5:30
जळगाव जि.प.ला शासनाकडून गुरुवारी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत तृतीय पारितोषीक मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
Next
जळगाव : कर्मचारी व्यवस्थापन, क्षमता, अंदाजपत्रकातील सूसूत्रता, योग्य नियोजन, उत्पन्नाची साधने व त्यातील वाढ, कामातील गतिमानता अशा विविध कार्यक्रमांसाठी जि.प.ला शासनाकडून गुरुवारी यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत तृतीय पारितोषीक मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रशस्तीपत्रक, 17 लाख रुपये, असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
सीईओ आस्तिककुमार पांडेय, आमदार स्मिता वाघ, जि.प.अध्यक्षा उज्जवला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी अध्यक्षा प्रयाग कोळी, माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार वाणी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दादा भुसे आदी उपस्थित होते. यशवंत प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमात जि.प.च्या सामान्य प्रशासन विभागातील कार्यालय अधीक्षक अमल चौधरी यांनाही गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.