जळगावात शिक्षकांचा ‘गुणवंत’ पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 06:30 PM2018-12-17T18:30:26+5:302018-12-17T18:33:15+5:30

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण रविवारी नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.

Gala by the teachers in Jalgaon, the 'Gunwant' award | जळगावात शिक्षकांचा ‘गुणवंत’ पुरस्काराने गौरव

जळगावात शिक्षकांचा ‘गुणवंत’ पुरस्काराने गौरव

Next
ठळक मुद्देसमता शिक्षक परिषदेतर्फे कार्यक्रमाचे आयोजनमाध्यमिक व प्राथमिक विभागातील ४२ शिक्षकांचा सन्मान

जळगाव : येथील महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण रविवारी नुतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले.
नाशिक विभागीय शिक्षण मंडळाचे उपसंचालक रामचंद्र जाधव , जि. प. शिक्षण सभापती पोपट भोळे,राज्य समता शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डी. के. अहिरे, प्राथमिकचे राजाध्यक्ष अरुण जाधव, विलास इंगळे, सुभाष म्हसके, भरत शिरसाठ, अशोक बिºहााडे, शिक्षक विलास नेरकर यांच्याहस्ते माध्यमिक विभागातील २३ व प्राथमिक विभागातील २१ शिक्षकांना गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी राज्य शासन आदर्श पुरस्कार प्राप्त जिल्हाध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर, बी.एन.पाटील आदी उपस्थित होते.
या शिक्षकांना मिळाला पुरस्कार
माध्यामिक विभाग- श्वेता पाटील (जळगाव), खुबचंद विद्यालयाचे प्रविण पाटील, करगाव आश्रम शाळेचे बाळकृष्ण महालपुरे, बी. एल. ठाकरे (शिरसगाव), हेमंत लोहार (अंबापिंप्री), शांताराम पाटील(गोडगाव),राजेंद्र चौधरी, कल्पना पाटील (पाचोरा) ,प्रा.समीर घोडेस्वार (जामनेर ),संदिप सोनवणे(भातखेडे), बाळू महाले (यावल ) दिपक बारी, अश्विनी कोळी(रावेर ), जयश्री कुलकर्णी, राजेंद्र पाटील (खडकेसिम),भिमराव बावस्कर (बोदवड), पांडुरंग लासुरे (रजोदा), शैला बैसाणे ( रंजाणे) शेख असलम शेख ताहीर (यावल ),योगेश साळुंखे (मेहुणबारे), वर्षा शिंदे( चाळीसगाव), अशोक बिºहाडे (अमळनेरचे), एम.आर.बावस्कर
प्राथमिक विभाग - भगवान कुमावत (कुंझरकर),अरूणा उदावंत (पाचोरा), विलास निकम (लोहारा), गुणवंतराव पवार (गोराडखेडा) पल्लवी शिंदे (कुसूंबा) जिजाबाई जंजाळ (कुºहे पानाचे), संतोष वानखेडे, रूपेश मेश्राम (जारगाव), संदिप सोनार ( टाकळी), किशोर काळे (चिंचखेडा), चारूशिला पाटील (तामसवाडी) राजेंद्र ठाकरे, भगवान बागड (निपाणे ) दर्शना चौधरी (शिरूड), जीवनकुमार शिरसाठ (येवती), पद्माकर चौधरी, किशोर पाटील (पुनखेडा), यशवंत बेलदार( पथराड), सुरेंद्र बोरसे (अंचळगाव तांडा) सुरेंद्र बोरसे, मिनाक्षी झांबरे (नागदुली), किशोर पाटील (चिंचपुरा) आदींचा समावेश आहे.

Web Title: Gala by the teachers in Jalgaon, the 'Gunwant' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.