जळगाव शहरातील सम्राट कॉलनीत मध्यरात्री जुगार अड्यावर पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:38 PM2017-12-18T13:38:24+5:302017-12-18T13:45:47+5:30

महामार्गाला लागून असलेल्या मनपा घरकुलाच्या शेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री धाड टाकली. त्यात २९ जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून  ८४ हजार ७७० रुपये रोख,५ दुचाकी, मोबाईल असा ३ लाख १४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

The gambling of Agaad police on the night of the monastery in Jalgaon city was underway | जळगाव शहरातील सम्राट कॉलनीत मध्यरात्री जुगार अड्यावर पोलिसांची धाड

जळगाव शहरातील सम्राट कॉलनीत मध्यरात्री जुगार अड्यावर पोलिसांची धाड

Next
ठळक मुद्दे २९ जणांना अटकस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  तीन लाख १४ हजाराचा ऐवज जप्त


आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१८ : महामार्गाला लागून असलेल्या मनपा घरकुलाच्या शेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री धाड टाकली. त्यात २९ जुगा-यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून  ८४ हजार ७७० रुपये रोख,५ दुचाकी, मोबाईल असा ३ लाख १४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
महामार्गाला लागून असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये भरत दिलीप बाविस्कर (रा.सम्राट कॉलनी, जळगाव) याच्या मालकीचा जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे यांनी सहायक निरीक्षक सागर शिंपी, सहायक फौजदार नुरोद्दीन शेख, सुभाष पाटील, राजेंद्र पाटील, नारायण पाटील, रवींद्र घुगे, सतीश हळणोर, रवींद्र चौधरी, शरद सुरळकर, प्रवीण हिवराळे यांच्या पथकाला रात्री बारा वाजता कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने शेडला घेरुन २९ जणांना पकडले. यावेळी काही जुगारी पळून जाण्याच यशस्वी झाले.
या जुगा-यांना केली अटक
पिरन वजीर पिंजारी (वय ३५, रा. तांबापुरा, जळगाव), अब्दुल रहेमान अब्दुल रऊफ (वय ४५, रा.शनी पेठ, जळगाव), शिवाजी पांडूरंग माळी (वय ३२ रा.सम्राट कॉलनी, जळगाव), राहूल सुरेश पाटील (वय २४, रा. लक्ष्मी नगर, जळगाव), विजय धनराज मोरे (वय २३, रा.रायपुर, ता.जळगाव), आकाश सुरेश पाटील (वय २२, रा.सम्राट कॉलनी,जळगाव), संजय मुरलीधर जोशी (वय ५०, रा.बालाजी पेठ, जळगाव), विठ्ठल जयराम हटकर (वय ३५, रा. तांबापुरा, जळगाव), नुरखान लिकायत खान (वय २५, रा.तांबापुरा, जळगाव), श्याम संतोष चव्हाण (वय २५, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव), विजय साहेबराव पाटील (वय ४०, रा.अयोध्या नगर, जळगाव), दीपक बन्सीलाल जैन (वय ३७, रा.मोहाडी फाटा, जळगाव), लखनसिंग देवसिंग पाटील (वय ४०, कुसुंबा, ता.जळगाव), प्रशात भरत शिंपी (वय २७,मेस्को माता नगर, जळगाव), अरफान खान फिरोज खान (वय २६, रा.बळीराम पेठ, जळगाव), जीवन सुभाष मराठे (वय २८, रा.कुसुंबा, ता.जळगाव), सागर वासुदेव पाटील (वय २२, रा.ईश्वर कॉलनी, जळगाव), रवींद्र रामदास ठाकूर (वय ४५, रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव),शिवाजी वसंत झुरकाळे (वय २५, रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव), संजय प्रकाश वालेचा (वय ३५, रा.सिंधी कॉलनी,जळगाव), किरण रमेश माळी (वय ३० रा.शनी पेठ, जळगाव), किशोर लोटू बारी (वय ३३ रा.शिरसोली, ता.जळगाव), संजय पुंडलिक बारी (वय ३२, रा.शिरसोली, प्र.बो.), संजय मोरसिंग चव्हाण (वय ४३, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव), गोकुळ दिलीप बाविस्कर (वय २८, रा.लक्ष्मी नगर, जळगाव), महेंद्र दशरथ फुसे (वय २७, रा.शिरसोली प्र.न.), प्रशांत राजाराम भोलाणे (वय २७, रा.लक्ष्मी नगर, जळगाव), आकाश सिताराम कोळी (वय २३, रा.मोहाडी, ता.जळगाव) व रवींद्र भगवान बारी (वय ४७, रा.शिरसोली प्र.बो.ता.जळगाव) यांचा समावेश आहे. या जुगा-यांना पहाटे तीन वाजता जामीनावर मुक्त करण्यात आले.

Web Title: The gambling of Agaad police on the night of the monastery in Jalgaon city was underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.