गणराया, यंदा तरी सुखकर्ता आणि दुःखहर्ता हो रे बाप्पा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:16 AM2021-07-30T04:16:41+5:302021-07-30T04:16:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : कोरोनाच्या विविध प्रकारच्या विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने देवदर्शन बंद आहे. सण उत्सव व यात्रांवर बंदी ...

Ganaraya, this year, however, be happy and sad, Bappa! | गणराया, यंदा तरी सुखकर्ता आणि दुःखहर्ता हो रे बाप्पा !

गणराया, यंदा तरी सुखकर्ता आणि दुःखहर्ता हो रे बाप्पा !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : कोरोनाच्या विविध प्रकारच्या विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने देवदर्शन बंद आहे. सण उत्सव व यात्रांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवावर यंदाही विरजण पडले आहे. मूर्ति बनवणाऱ्या कारागिरांवर आर्थिक संकट येणार आहे. त्यामुळे गणेशाला साकारणारे मूर्तिकार गणरायाला प्रार्थना करू लागले की यावर्षी तरी सुखकर्ता आणि दुःखहर्ता हो रे बाप्पा !

सार्वजनिक गणेशोत्सवावर नियमांचे सावट तर चार फुटांपेक्षा मोठ्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कारागीरांना लहान मूर्ती बनवण्यात समाधान मानावे लागत आहे. पीओपीच्या मूर्तींवर बंदी आहे. शासन ‘एक गाव एक गणपती’साठी आग्रही असल्याने यावर्षी लहान मूर्तीदेखील कमी विक्री होतील. फक्त मूर्तीच्या व्यवसायावर अवलंबून असल्याने दोन वर्षांपासून उपजीविका करणे कठीण झाले आहे.

दरम्यान, पेट्रोलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मालाची आयात महागली आहे. रंग महाग झाले आहेत. त्याचप्रमाणे इंधनवाढीमुळे आयत्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीदेखील आणायला महाग पडणार आहेत.

२०२० च्या संकटामुळे अनेक गणेश मंडळांनी यंदाही आपले उत्सव रद्द केले आहेत. शहरातील संजय भावसार अनेक वर्षांपासून मूर्तीचे व्यवसाय करीत आहेत. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी १० महिन्यापासूनच त्यांनी मूर्ती बनवणे सुरू केले आहे. मूर्तींवर रंगाचा हात फिरवणे सुरू आहे. गणेशावरची श्रद्धा आणि भक्ती असल्याने कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी देवाची मूर्ती मन लावून साकारणे हीच खरी सेवा आहे, असे मानून मूर्तिकार कामाला लागले आहेत.

यंदा गुंतवलेले भांडवल वाया जाऊ नये म्हणून लहान मूर्तीच बनवल्या आहेत आणि त्याही मोजक्या प्रमाणात बनवल्या आहेत. महागाई वाढली असल्याने त्याचे परिणाम मूर्तींच्या किमतीवर होणार आहेत.

-संजय भावसार, माजी उपाध्यक्ष, तालुका मूर्तिकार संघटना, अमळनेर

तिसऱ्या पिढीपासून हा व्यवसाय करीत आहोत. त्यामुळे गणरायाच कोरोनाचे संकट दूर करेल. त्याच आशेवर पुन्हा जोमाने मूर्ती साकारल्या आहेत.

-परेश भावसार, मूर्तिकार, अमळनेर

Web Title: Ganaraya, this year, however, be happy and sad, Bappa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.