गांधीजींचे सार्वजनिक कामांचे व्यवस्थापन, महाराष्ट्रातील गांधीजी या विषयावर दाम्पत्याची पीएच.डी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:50 AM2021-01-08T04:50:23+5:302021-01-08T04:50:23+5:30
‘गांधीजींच्या सार्वजनिक कामांसाठी आर्थिक साधने संकलनः प्रयत्न, पद्धती आणि व्यवस्थापन’ या विषयात अश्विन झाला यांनी संशोधन केले. जैन हिल्स ...
‘गांधीजींच्या सार्वजनिक कामांसाठी आर्थिक साधने संकलनः प्रयत्न, पद्धती आणि व्यवस्थापन’ या विषयात अश्विन झाला यांनी संशोधन केले. जैन हिल्स स्थित गांधी रिसर्च फाउंडेशनमध्ये झाला कार्यरत आहेत. गांधीजींच्या फंड रेझिंग या विषयासंदर्भातील हे प्रथम संशोधन आहे. स्व. भवरलाल जैन यांनी त्यांना गांधी रिसर्च फाउंडेशन रेसिडेंट स्कॉलरसाठी संशोधन करावे, अशी प्रेरणा दिली होती. गांधीतीर्थमधील वाचनालयातून झाला दाम्पत्यास संशोधनासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. अश्विन झाला यांच्या पत्नी निर्मला झाला यांनीही त्याच कालवधीत भवरलाल जैन यांच्याच प्रेरणेने ‘महाराष्ट्रातील गांधीजीः कालगणना, प्रसंग आणि कृती’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली. प्रस्तुत विषयही भवरलाल जैन यांनी सुचविला होता. गुजराथ विद्यापीठात त्यांचे प्रबंध ऑनलाइन सादर झाले. सद्यपरिस्थितीत व्हायवाही ऑनलाइन घेण्यात आला.
अभिनंदनीय बाब म्हणजे गुजरात विद्यापीठाने दोन्ही प्रबंध तीन वेगवेगळ्या भाषेत म्हणजे गुजराथी, हिंदी आणि इंग्रजीत मुद्रित करण्याचे निश्चित केले असून, मराठीतही भाषांतरीत करण्याची सूचना केली आहे. झाला दाम्पत्यास गुजराथ विद्यापीठाचे डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचे मार्गदर्शन लाभले.