मेणगावच्या गणेशची 32 देशांत गायकी

By admin | Published: April 14, 2017 01:04 PM2017-04-14T13:04:30+5:302017-04-14T13:04:30+5:30

जामनेर तालुक्यातील मेणगाव येथील गणेश पाटील उर्फ पी.गणेश यांनी 32 देशांमध्ये आपल्या गायनाचा ङोंडा रोवला आहे.

Ganesh in Mangaon has 32 vocal chants in 32 countries | मेणगावच्या गणेशची 32 देशांत गायकी

मेणगावच्या गणेशची 32 देशांत गायकी

Next

पाच भाषेत गायन :  नामांकित गायकांसमवेत कार्यक्रम

 
ऑनलाईन लोकमत विशेष /दीपक जाधव  
शेंदुर्णी, ता.जामनेर, दि.4- संगीत व गायनाचा कोणताही वारसा नसताना जामनेर तालुक्यातील मेणगाव येथील गणेश पाटील उर्फ पी.गणेश यांनी 32 देशांमध्ये आपल्या गायनाचा ङोंडा रोवला आहे. नामांकित गायकांसोबत  काम करणा:या गणेश गायनासोबतच सामाजिक जबाबदारी सांभाळत आहे.
मेणगाव, ता.जामनेर येथील गणेश पुंडलिक पाटील (वय 40) या कलावंतांने  32 देशात आपल्या गायनाचे कार्यक्रम केले आहेत.  गायक ‘पी गणेश’ या टोपण नावाने ओळखला जाणा:या या कलावंताने घरात कुठलीही परंपरा नसताना संगीत 
क्षेत्रात नाव कमावले आहे. त्यामुळे गाव आणि पर्यायाने जामनेर तालुक्याचे नावही सातासमुद्रापार पोहचले आहे. 
नामांकित गायकांसोबत केले काम
गणेशने  आतार्पयत अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती, संजीवनी भेलांडे, उदीत नारायण, हरीहरन, साधना सरगम, वैशाली सावंत, सुरेश वाडकर, बाबूल सुप्रिओ, अमितकुमार,  शैलेंद्रसिंग या नामांकित गायकांसमवेत 32 देशांमध्ये गायनाचे कार्यक्रम केले आहेत.
भजनाचा सराव करीत झाला गायक  
मेणगाव हे 2 ते 3 हजार लोकवस्तीचे गाव आहे. गणेश 7-8 वर्षाचा असताना आजोबा गोविंदराव पाटील  यांच्यासोबत मंदिरात  येत असे. त्यांच्यासमवेत तो भजने म्हणायचा. भजन म्हणत असताना त्याला गायनाची आवड निर्माण झाली. आपल्या गोड आवाजने त्याने सर्वाचे लक्ष वेधले. काही वर्षापूर्वी शेंदुर्णी येथील सिनेगीत स्पर्धेत त्याने  सहभाग घेतला. या स्पर्धेत त्याला पहिले बक्षीस मिळाले.
अमेरिकेसह 32 देशात गायन
गणेश यांनी 1993-94 ला पुण्याला जाण्याचे ठरविले. इयत्ता दहावीनंतर शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर देशातील विविध ऑर्केस्ट्रामधून किशोरदांची विविध गाणी गायली. नितीन मुकेश  यांच्या समवेत  त्यांनी पहिला अमेरिका दौरा केला. आजवर बांगलादेश, कॅनडा, वेस्टइंडीज, दुबई, युरोप, श्रीलंका आदी  32 देशांमध्ये गायनाचे कार्यक्रम केले आहेत. जि.प. सदस्य संजय गरुड यांचे  प्रोत्साहन  मिळत राहिले. 
बंगाली, उडिया, भोजपुरी भाषेत सादर केली गाणी
जॉली मुखर्जी यांच्यासोबत  अनेक देशांमध्ये दौरे केले आहेत. एस.डी. बर्मन, आर.डी. बर्मन, किशोरकुमार यांची गीते  विदेशात चांगलीच लोकप्रिय असल्याचे ते सांगतात. अनेक चित्रपटांमध्येसुद्धा त्यांनी पाश्र्वगायन केले आहे.  मराठी, बंगाली, उडिया, भोजपुरी व हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये गणेशने गाणी म्हटली आहे.  याशिवाय  त्याचे अल्बम आले आहेत. 26 मार्च रोजी  ‘माणूस एक माती’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या चित्रपटातील गाणी पी. गणेशने गायले आहे.  कलाकार मनोजकुमार यांचे  पुत्र विशाल गोस्वामी, नितीन मुकेश, व अमितकुमार यांच्यासमवेत 10 वर्षापासून त्यांचे गाण्यांचे कार्यक्रम सुरु आहेत. 
गायनासोबत सामाजिक बांधिलकी
वडिल पुंडलिक गोविंदराव पाटील व आई उषाबाई  पाटील या शेतकरी जोडप्याची सामाजिक कार्याची परंपरा आहे. तीच परंपरा आणि  आदर्श ‘पी गणेश’ यांनी कायम ठेवला आहे. मेणगाव येथे आरोग्य शिबिर, सार्वजनिक वाचनालय याची कामे गणेशने सुरु केली आहेत. या वर्षी शेंदुर्णी येथे ऑर्केस्ट्रॉचे आयोजन करण्यात येणार आहे. यामाध्यमातून मिळणा:या उत्पन्नातून अद्ययावत वाचनालय व विद्याथ्र्यासाठी शैक्षणिक तसेच आरोग्य शिबिरासारखे कार्यक्रम राबण्यिात येणार असल्याचे गणेश यांनी सांगितले. गणेशला चार बहिणी आहेत. मुलगा रशमीन व प}ी अर्चना यांचीही साथ मिळत आहे. 

Web Title: Ganesh in Mangaon has 32 vocal chants in 32 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.