गणेशवाडीत मद्यपीने घेतली विहिरीत उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 10:15 PM2017-09-27T22:15:23+5:302017-09-27T22:17:36+5:30
मद्याच्या नशेत तर्रर असलेल्या किरण शांताराम सोनवणे (वय ५० रा.जोशी पेठ, जळगाव) याने बुधवारी दुपारी तीन वाजता गणेशवाडीतील महापालिकेच्या एका विहीरीत उडी घेतली. आत्महत्या केल्याची अफवा पसरल्याने पोलीस व मनपाच्या अग्निशमन यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. तासाभराच्या मेहनतीनंतर सोनवणे याला सुखरुप बाहेर काढण्यात आले. तिसºया प्रयत्नात निघाला बाहेर
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२७ : मद्याच्या नशेत तर्रर असलेल्या किरण शांताराम सोनवणे (वय ५० रा.जोशी पेठ, जळगाव) याने बुधवारी दुपारी तीन वाजता गणेशवाडीतील महापालिकेच्या एका विहीरीत उडी घेतली. आत्महत्या केल्याची अफवा पसरल्याने पोलीस व मनपाच्या अग्निशमन यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली. तासाभराच्या मेहनतीनंतर सोनवणे याला सुखरुप बाहेर काढण्यात आले.
तिसºया प्रयत्नात निघाला बाहेर
या विहिरीत प्रचंड पाणीसाठा आहे. सोनवणे याला पोहता येत असल्याने तळाशी लागत होता, मात्र मद्याच्या नशेत तोल जाऊन पुन्हा पाण्यात कोसळत होता. मुन्ना परदेशी व सहकाºयांनी दोराच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. विहिर खोल व अरुंद असल्याने मनपाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, मात्र हे पथक येण्याआधी तिसºया प्रयत्नात सोनवणेला बाहेर का
ढण्यात आले.
संतापात मारली विहिरीत उडी
बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी सोनवणे याची चौकशी केली असता संतापात आपण उडी मारल्याचे त्याने सांगितले. पत्नी व मुलानेही लागलीच घटनास्थळी धाव घेतली. घरात कोणताही वाद विवाद नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी हा निर्णय का घेतला हे आम्हालाही माहित नाही असे त्यांनी पोलिसांना सांगितले.